Agriculture news in Marathi Sonography machine in animal market | Agrowon

नगर : जनावरांच्या बाजारात सोनोग्राफी मशिन बसविण्यात येणार

टीम अॅग्रोवन
शनिवार, 14 मार्च 2020

नगर ः शेतकरी बाजारात गाभन गाई-म्हशीची खरेदी करतात. या वेळी गर्भधारणेचा कालावधी कमी असला तरी जास्ती सांगून अनेक वेळा शेतकऱ्यांची फसवणूक होते. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी जनावरांचे बाजार असलेल्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सोनोग्राफी मशिन बसविण्यात येणार आहे. त्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. नव्या वर्षात जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून वेगवेगळ्या लाभाच्या योजना देण्यासाठी तरतूद केली जाणार आहे. राज्यात जिल्हा परिषदेचा हा पहिलाच प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.

नगर ः शेतकरी बाजारात गाभन गाई-म्हशीची खरेदी करतात. या वेळी गर्भधारणेचा कालावधी कमी असला तरी जास्ती सांगून अनेक वेळा शेतकऱ्यांची फसवणूक होते. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी जनावरांचे बाजार असलेल्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सोनोग्राफी मशिन बसविण्यात येणार आहे. त्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. नव्या वर्षात जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून वेगवेगळ्या लाभाच्या योजना देण्यासाठी तरतूद केली जाणार आहे. राज्यात जिल्हा परिषदेचा हा पहिलाच प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.

नगर जिल्ह्यात लोणी, काष्टी, घोडेगाव आदी ठिकाणी जनावरांचा बाजार भरतो. गोरगरीब शेतकरी येथे खरेदीसाठी येतात. खरेदीवेळी गायीला गर्भधारणा झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात गर्भधारणा झालेली नसते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. ते टाळण्यासाठी जनावरांची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री होत असलेल्या बाजाराच्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून सोनोग्राफी मशिन बसवाव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्याबाबत आता विचार सुरू असून, लवकरच असे मशिन बसविले जाणार आहे.

किती ठिकाणी हे मशिन बसवले जाणार हे निश्चित नसले तरी जास्तीत जास्त ठिकाणी हे मशिन बसवण्याचा प्रयत्न असेल. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण पाहिले असता त्यात दूध उत्पादक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे एकही उदाहरण दिसून येत नाही. त्यामुळे आगामी अंदाजपत्रकात शेतकऱ्यांसाठी विविध योजना प्रस्तावित करण्याचा जिल्हा परिषदेचा प्रयत्न आहे, असे सभापती सुनील गडाख यांनी सागितले. 

कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे जिल्ह्यात कोंबड्यांची विक्री थंडावली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कुक्कुटपालकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांकडून नुकसानीची माहिती मागविण्यात आली असून, माहिती जमा झाल्यावर शासनाकडे कुक्कुटपालकांसाठी आर्थिक पॅकेज देण्याची मागणी आता पुढे येऊ लागली आहे. त्यावरही विचार केला जाणार आहे.

दुग्ध उत्पादकांना देणार मिल्किंग मशिन
जिल्ह्यातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना जनावरांचे दूध काढण्यासाठी पुढील आर्थिक वर्षात मिल्किंग मशिन देण्यात येणार आहे. त्यासाठी आगामी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती गडाख यांनी दिली. किसान क्रेडिट कार्डमार्फत १ लाख ६० हजारांपर्यंत जनावरे घेण्यासाठी कमी व्याजदरात पैसे देण्यात येत असून, त्याचाही लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.


इतर ताज्या घडामोडी
जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे...नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस...
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार ...नाशिक: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व...
मका खरेदी तातडीने सुरू कराबुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून...
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन...अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच सिंधुदुर्ग: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही...
जादा खरेदी दर, नापासच्या अधिक ...अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित...
ऊस उत्पादक केंद्राचे वैरी आहेत काय? कोल्हापूर: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या...
अकोला जिल्हा परिषदेचा ७६ कोटींचा निधी...अकोला  ः ‘कोरोना’मुळे निर्माण झालेल्या...
हिंगोली जिल्ह्यात ५९ कोटींचे पीककर्ज...हिंगोली   ः हिंगोली जिल्ह्यातील विविध...
कापूस, सोयाबीन उत्पादक विमा...गडचिरोली: धान उत्पादक ३४ हजार शेतकऱ्यांना सुमारे...
नांदेडमध्ये ४७ कोटी ४७ लाखांचे पीक कर्ज...नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बॅंकांनी...
जालन्यात पाच हजार टन खते एकाच दिवशी...जालना  : जिल्ह्यात एकाच दिवशी पाच हजार...
कर्जमुक्‍ती योजनेची प्रक्रिया ३०...भंडारा ः शासनाने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिराव...
जयपूरमध्ये वीज पडून लाखो रुपयांच्या...नाशिक : पूर्वमोसमी पाऊस सुरू झाल्यानंतर बागलाण...
बुलडाणा जिल्ह्यात १५ तारखेपर्यंत...बुलडाणा  : यंदा जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पाऊस...
भाजीपाल्याची थेट खरेदी विक्री व्यवस्था...पुणे ः कोरोना टाळेबंदीमध्ये शहरातील विविध भागात...
सातारा जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीसातारा ः जिल्ह्यात सोमवारी सर्वदूर पावसाने हजेरी...
कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांचा रास्तारोकोयवतमाळ ः महागाव तालुक्‍यातील गुंज येथील...
पुणे जिल्ह्यात पीककर्ज वितरणात...पुणे ः लाॅकडाऊनच्या काळात होरपळून निघालेल्या...
किरकोळ आजारांकडे नको दूर्लक्षमहिलांनी घराकडून शेताकडे जाताना चेहऱ्यावर पदर...