Agriculture news in marathi As soon as the flood recedes in the Girna belt, sand extraction starts | Agrowon

गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा सुरू

टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर, अतिपावसाचा पाण्याचा मोठा फटका बसला आहे. यातच पूर ओसरत नाही, तोच नदीतून वाळू उपसा सुरू झाला आहे.

जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर, अतिपावसाचा पाण्याचा मोठा फटका बसला आहे. यातच पूर ओसरत नाही, तोच नदीतून वाळू उपसा सुरू झाला आहे. यामुळे गिरणा नदीमधील वाळू उपसा बंद करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. 

गेल्या सहा सात वर्षांपासून गिरणा नदीतून वाळू उपसा सुरूच आहे. यामुळे नदीकाठच्या शिवारात नदी, कूपनलिकांचे पाणी आटण्याचे प्रकार वाढले आहे. कितीही पूर आला, चांगला पाऊस झाला, तरीही नदीकाठच्या विहिरींमधील जलसाठा मार्चमध्येच कमी होतो. नदीत वाळू असली, तर पाणी मुरते. पण, वाळूच कमी झाली आहे. यामुळे नदीतील पाणी वाहून जाते. यामुळे वाळूचा बेकायदेशीर उपसा किंवा प्रशासनाकडून मंजुरी घेऊन सुरू होणारा वाळू उपसा बंद झाला पाहिजे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. 

गिरणेच्या वाळूवर मोठे अर्थकारण गावोगावी सुरू आहे. ग्रामपंचायतींची भूमिका लक्षात न घेता वाळू उपसा लिलाव करून प्रशासन सुरू करण्यास मंजुरी देते. गिरणा नदीकाठच्या सुमारे १०० गावांमधून बारमाही वाळू उपसा सुरू असतो. रात्री, पहाटे वाळू उपसा करणारी वाहने फिरतात. सुसाट धावतात. शेतरस्ते, गावांचे मुख्य रस्ते याची मोठी दयनीय अवस्था झाली आहे.

अत्यंत दर्जेदार वाळू म्हणून गिरणेच्या वाळुचे महाराष्ट्रात नाव आहे. यामुळे मुंबई, नाशिक, नगर, बुलडाणा व इतर भागातही गिरणेची वाळू पाठविली जाते. अनेक मध्यस्थ, खरेदीदार, वाहतुकदार, अशी साखळी तयार झाली आहे.

ही साखळी तोडणे प्रशासनाला अशक्य होत आहे. कारवाई काही दिवस केली जाते. पुन्हा वाळूचा उपसा सुरू होतो. 
काही गावांमधून २२ ते २३ वर्षांपासून वाळू उपसा सुरू आहे. त्यात जळगाव, धरणगाव तालुक्यातील अनेक गावे या समस्येने त्रस्त आहे


इतर ताज्या घडामोडी
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
पुण्यात दसऱ्यानिमित्त फुलबाजार फुलला पुणे ः कोरोना संकटामुळे मार्चपासून सलग पाच...
सोयाबीनमध्ये तेजीचाच कलअकोला ः या हंगामातील सोयाबीन काढणी जोरात सुरू...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
औरंगाबादमध्ये कांदा सरासरी ३५०० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
राज्यातून मॉन्सून परतीच्या वाटेवर; पाऊस...महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या वाटेवर...
सांधेदुखी, सूजेवर आरोग्यदायी गोखरूगोखरू ही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. या वनस्पतीला...
शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न करु...सोलापूर : ‘‘अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतपिकांचे...
खानदेशात पावसाने दाणादाण सुरूचजळगाव ः खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात मध्यम...
जिगाव प्रकल्पग्रस्तांना मिळणार योग्य...बुलडाणा ः जिगाव प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला...
सोलापुरात नुकसानग्रस्तांसाठी `रयत’चे...सोलापूर : सोलापूरसह संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे...
साताऱ्यात रब्बीची १२ टक्के क्षेत्रावर...सातारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने झोडपल्याने...