मंगळवेढा तालुक्याला लवकरच ‘म्हैसाळ’चे पाणी ः पालकमंत्री देशमुख

मंगळवेढा तालुक्याला लवकरच ‘म्हैसाळ’चे पाणी ः पालकमंत्री देशमुख
मंगळवेढा तालुक्याला लवकरच ‘म्हैसाळ’चे पाणी ः पालकमंत्री देशमुख

सोलापूर : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून मंगळवेढा तालुक्यासाठी लवकरच पाणी सोडले जाईल, अशी माहिती पालकमंत्री विजय देशमुख यांनी आज दिली.

मंगळवेढा तालुक्यास म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्याबाबत मंगळवेढा येथील युटोपियन शुगर, येथे पालकमंत्री देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस आमदार प्रशांत परिचारक, सांगली पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता एच. आर. गुणाले, कार्यकारी अभियंता विजय पाटील, उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार अप्पासाहेब समिंदर उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले, म्हैसाळ योजनेचे जत कालव्याद्वारे मंगळवेढा तालुक्यात पाणी आणण्यात येणार आहे. या कालाव्याच्या ६० ते ७० कि.मी.पर्यंतचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर वितरिका क्रमांक एक मधून लवकरच पाणी सोडण्यात येईल. यामुळे मंगळवेढा तालुक्याला प्रथमच म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी मिळणार आहे.

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतील पाण्याचा मंगळवेढा तालुक्यातील १३ गावांतील सुमारे सहा हजार हेक्टर क्षेत्रास लाभ होणार आहे. तसेच या पाण्याद्वारे गावतळी भरून साठा केला जाणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. श्री. देशमुख यांनी मंगळवेढा तालुक्यात म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी येणाऱ्या हुन्नुर, मानेवाडी, हंगिरगी, सिरनांदगी, डिकसळ, वायफळ येथील कालवा व वितरिकांची पाहणी करून म्हैसाळ योजनेच्या जत मुख्य कालव्याच्या कामाची पाहणी केली.

श्री. देशमुख यांच्या भेटप्रसंगी भोसे, हुन्नुर, मानेवाडी, हंगिरगी, डिकसळ गावांतील ग्रामस्थांनी गावात पाणी, चारा उपलब्ध व्हावा, अशी मागणी केली. पाणी आणि जनावारांसाठी चारा प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्या गावात टँकरची आवश्यकता आहे त्यांनी प्रस्ताव पाठवावेत, अशा सूचना श्री. देशमुख यांनी महसूल अधिकाऱ्यांना केल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com