...त्यानंतर वैधानिक मंडळे घोषित करू : उपमुख्यमंत्री अजित पवार 

‘‘ज्या दिवशी राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची नावे घोषित होतील, त्याच दिवशी वैधानिक मंडळे घोषित करू,’’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीविधानसभेत ठणकावून सांगितले.
बारा आमदारांची नावे घोषित होताच  वैधानिक मंडळे घोषित करू : उपमुख्यमंत्री अजित पवार As soon as the names of twelve MLAs were announced Let's declare statutory boards: Deputy Chief Minister Ajit Pawar
बारा आमदारांची नावे घोषित होताच  वैधानिक मंडळे घोषित करू : उपमुख्यमंत्री अजित पवार As soon as the names of twelve MLAs were announced Let's declare statutory boards: Deputy Chief Minister Ajit Pawar

मुंबई : ‘‘ज्या दिवशी राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची नावे घोषित होतील, त्याच दिवशी वैधानिक मंडळे घोषित करू,’’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  विधानसभेत ठणकावून सांगितले.

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वैधानिक मंडळाच्या विषयावरून गदारोळ निर्माण झाला. सभागृह सुरू होताच विकास मंडळाबाबतच्या सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेचा निषेध नोंदवून विरोधी पक्षाने सभात्याग केला. विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यावर विकास महामंडळाच्या पुनर्स्थापनेचे विषय समोर आला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वैधानिक विकास महामंडळावरून सरकारला धारेवर धरले.

या वेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘‘उपमुख्यमंत्र्यांनी १५ डिसेंबर २०२० रोजी विदर्भ वैधानिक विकास महामंडळांची स्थापना केली जाईल, अशी घोषणा केली होती. त्या घोषणेला आज ७२ दिवस झाले, तरी घोषणा पूर्ण झाली नाही. पुरवणी मागणीच्या संदर्भात अजित पवारांनी सांगावे की, विकासाचा समतोल साधलेला आहे. म्हणजे मग आज रात्री बसून आम्ही ती सगळी आकडेवारी तपासून बघू की खरेच विकास झाला आहे किंवा नाही. समतोल विकास नसेलच, तर तसे तरी सांगावे. म्हणजे ती आकडेवारी तपासून पाहण्याची गरजच पडणार नाही.’’ 

त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून सुरू असलेल्या सरकारच्या अडवणुकीकडे लक्ष वेधले. पवार म्हणाले, ‘‘विकास महामंडळे आम्ही स्थापन करू. बजेटमध्ये मी तसा निधीही देईन. ज्या दिवशी राज्यपाल बारा आमदारांची नावे जाहीर करतील, त्या दिवशी आम्ही वैधनिक विकास मंडळ घोषित करू.’’ 

पवारांनी बारा आमदारांचा विषय उपस्थित करताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला. फडणवीस म्हणाले, ‘‘दादांच्या पोटातले आता ओठांवर आले. बारा आमदारांसाठी मराठवाडा, विदर्भातल्या लाखो लोकांना ओलिस ठेवले आहे का? आम्ही जे मागत आहोत, ते आमच्या हक्काचे आहे. तुम्ही आम्हाला भीक देत नाही. तुम्ही देणार नसाल, तर आम्ही भांडून मिळवू, आमचे म्हणणे ऐकले जात नसेल तर आम्ही एक मिनीट सभागृहात बसणार नाही. कामकाज रेटून न्यायचे असेल तर आम्हाला बसवता कशाला.’’ 

काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानाचा धागा पकडत विरोधकांवर खोचक शेरेबाजी केली. पटोले म्हणाले, ‘‘माझी उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, गेल्या पाच वर्षांमध्ये विदर्भ आणि मराठवाड्याचा बॅकलॉग वाढला का? याचीही माहिती आपण सभागृहाला दिली पाहिजे. मुनगंटीवारांच्या रात्रीच्या वक्तव्याचा संदर्भ देऊन पटोले म्हणाले की, हे रात्री आणि पहाटेच्याच गोष्टी करतात. ते तसे का करतात, हे मला अजून कळले नाही. पटोले असे म्हणताच सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी बाकांवर हशा पिकला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com