Agriculture News in Marathi Soon Plan for Sheep Protection: Filling Dattatraya | Page 3 ||| Agrowon

मेंढ्यांच्या संरक्षणासाठी लवकरच योजना ः दत्तात्रय भरणे 

टीम अॅग्रोवन
रविवार, 5 डिसेंबर 2021

पावसाची संततधार, अतिवृष्टी व गारठ्यामुळे राज्यातील सुमारे साडेतीन हजार मेंढ्या मृत्युमुखी पडून मेंढपाळांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

सुपे, जि. पुणे ः पावसाची संततधार, अतिवृष्टी व गारठ्यामुळे राज्यातील सुमारे साडेतीन हजार मेंढ्या मृत्युमुखी पडून मेंढपाळांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. पण भविष्यात असे नुकसान टाळण्यासाठी काही उपाययोजना करता येईल का यावर विचार विनिमय चालू असल्याचे सूतोवाच राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सुपे (ता. बारामती) येथे केले. 

सुपे व परिसरातील गावांमध्ये अतिवृष्टीमुळे अनेक शेळ्या-मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. भरणे यांनी शुक्रवारी (ता.३) रात्री आठच्या दरम्यान पावसाळी वातावरणात कुतवळवाडीतील नुकसानग्रस्त मेंढपाळांच्या वाड्यावर जाऊन पाहणी करून उपस्थित मेंढपाळांना सरकारकडून प्रती मृत मेंढीस चार हजार रुपयांप्रमाणे नुकसान भरपाई दिली जाईल, अशी ग्वाही दिली. पंचनामे करण्याच्या सूचना संबंधितांना केल्या आहेत. निसर्गाचे संकट आहे. सामोरे गेले पाहिजे. आम्ही सरकार म्हणून तुमच्या पाठिशी आहोत. निसर्गापुढे कोणाचे चालत नाही. तुम्हाला आधार देण्याचे काम सरकार करत आहे, असा धीर मेंढपाळांना दिला. यावर कायमस्वरूपी काय करता येईल यासाठी तज्ज्ञांकडून अभिप्राय मागवून उपाययोजना करण्याचे विचाराधीन असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. 

अशी मिळणार मदत 
तालुक्यातील कानाडवाडीत लांडग्यांच्या हल्ल्यात २४ मेंढ्या दगावल्या असून, त्यांना वन विभागाकडून मदत मिळण्यासाठी संबंधितांना सूचना केल्याचे सांगून भरणे म्हणाले, ‘‘राज्यातील विशेषतः पुणे, नगर, सातारा, नाशिक जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे मेंढ्या दगावल्या आहेत. पुणे २०००, नगर ७००, नाशिक ५१५, सातारा २०० मेंढ्या दगावल्या आहेत. यापैकी पुणे जिल्ह्यात जुन्नर व आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक प्रत्येकी सुमारे साडेसातशे मेंढ्या दगावल्याची नोंद आहे. गारठा असल्याने मृत मेंढ्यांचा आकडा आणखी वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे दगावलेल्या एका गाईसाठी ४० हजार, बैलासाठी ३० हजार तर शेळी-मेंढीसाठी ४ हजार रुपये मदत दिली जाणार आहे.’’ 

विम्याची मागणी
भविष्यात असे नुकसान टाळण्यासाठी मेंढपाळांना निवारा, कारपेट, विमा सारखी कायमस्वरुपी योजना राबवण्याची मागणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी या वेळी केली. रामभाऊ लकडे, भानुदास चौधरी, अनिल हिरवे, दत्तात्रेय कदम, शंकर महानवर, भीमा कोकरे आदींनी या वेळी नुकसानीची माहिती दिली. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. शितलकुमार मुकणे, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, नायब तहसीलदार विलास करे, तालुका पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. आर. आर. पाटील, मंडलाधिकारी लक्ष्मीकांत मुळे, अभिमान माने आदींसह परिसरातील कार्यकर्ते, मेंढपाळ, शेतकरी उपस्थित होते. 

मॉन्सूनोत्तर पावसाने राज्यात 
५ हजार पशुधन मृत्युमुखी 

 

पुणे ः गेल्या तीन दिवसांत राज्याच्या विविध भागांत झालेल्या अवकाळी पावसाने भिजल्याने आणि थंडी वाजल्याने राज्यात सुमारे ५ हजार पशुधन, शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची नोंद पशुसंवर्धन विभागाकडे झाली. या घटनांचे पंचनाने सुरू करण्यात आले असून, हा आवका वाढीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर सर्वाधिक पुणे जिल्ह्यात २ हजार पशुधन दगावल्याची नोंद झाली आहे. 

रायगड, सिंधुदुर्ग, नगर, नाशिक, पुणे आणि सातारा या प्रमुख तालुक्यांमध्ये शेळ्या मेंढ्या आणि पशुधन मृत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या सहा जिल्ह्यांतील ४० तालुके आणि ३२१ गावांमध्ये घटनांची नोंद झाली आहे. यामध्ये १९ गायी, ३ म्हशी, २ बैल, ५ वासरे आणि ४ हजार ७२९ शेळ्या-मेंढ्याची नोंद झाली आहे. हा आवका आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

अनेक ठिकाणी मेंढपाळांना मेंढ्यांवरची लोकर काढल्याने अचानक आलेला पाऊस आणि थंडीचा अधिक तडाखा त्यांना बसल्याने मृत्युमुखी पडल्याच्या घटना वाढल्याचे पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे यांनी सांगितले. तर अनेक ठिकाणी तातडीचे लसीकरण आणि पशुवैद्यकीय उपचार सुरू करण्याचे आदेश सर्व पातळीवरील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. 


इतर बातम्या
नगरमध्ये दीड लाख हेक्टरवर कांदा लागवडनगर ः नगर जिल्ह्यात यंदाही कांदा लागवडीला...
लासलगाव स्टेशनवर किसान रेल्वेच्या ...नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा,...
औरंगाबादच्या ३८५ कोटींच्या प्रारूप...औरंगाबाद : कोविड, महसुलात घट आदींमुळे जिल्ह्याला...
मराठवाड्यात केशर आंबा लागवडीस वाव : डॉ...औरंगाबाद ः ‘‘केशर आंबा, लागवडीस मराठवाड्यात वाव...
खोडवा उसात पंचसूत्री महत्त्वाची : डॉ....केज, जि. बीड : ‘‘खोडवा उसाची योग्य जोपासना...
हिंगोलीचा वार्षिक योजनेचा आराखडा १७०...हिंगोली ः औरंगाबाद येथे शुक्रवारी (ता.२१) आयोजित...
सिंधुदुर्गात पशुसंवर्धनाच्या २.१९ कोटी...सिंधुदुर्गातनगरी ः विविध १६ योजनांचा समावेश...
सोलापूर: उजनीतून रब्बीसाठी एक, उन्हाळी ...सोलापूर ः उजनी धरणातून रब्बी हंगामासाठी एक तर...
बुलडाणा: नारी शक्ती पुरस्कारासाठी ३०...बुलडाणा : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास...
सांगली जिल्हा बॅंकेचा बड्या...सांगली ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बड्या...
पाणीपुरवठ्याचे थकीत देयक भरल्यास अर्धा...वाशीम ः ग्रामीण भागातील नागरिकांना जिल्हा...
नांदेड जिल्ह्यात अनुदानावर भुईमुगाचे...नांदेड जिल्ह्यात : उन्हाळी हंगाम २०२१-२२ साठी...
खानदेशात तूर काढणीचा हंगाम सुरू जळगाव : खानदेशात तूर काढणीचा हंगाम सुरू झाला आहे...
नाशिक विभागाला ३४६ कोटींचा वाढीव निधी...नाशिक : सन २०२२-२३ साठी नाशिक विभागाला जिल्हा...
नगर विभागात ऊसगाळपात यंदाही खासगी साखर...नगर, ः नगर जिल्ह्यात यंदा सतरा सहकारी व नऊ खासगी...
नागपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा नागपूर ः अवकाळी पावसामुळे नागपूर जिल्ह्यात मोठ्या...
कृषी वीजपुरवठा खंडित केल्यास तीव्र...अमरावती : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील...
अचलपूर तालुक्यातील तीन कृषी...अमरावती : खत वितरणात अनियमितता निदर्शनास आल्याने...
‘जवस आर्थिक सुबत्तेचा सक्षम पर्याय’ नागपूर ः बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊनच पिकांची...
इथेनॉलच्या दरात दुजाभाव नकोधान्यापासून इथेनॉल उत्पादित करणाऱ्यांनी सरकारकडे...