Agriculture news in Marathi A soothing law for farmers: Chandrakant Patil | Agrowon

शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः चंद्रकांत पाटील

टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

शेतकऱ्याला हे विधेयक सुखावणारे आहे. त्यामुळेच गावागावात शेतकऱ्यांनी गुढ्या उभ्या केल्या आहेत, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य विधेयक हे शेतकऱ्यांच्या पायातील बेड्या तोडणारे आहे. या विधेयकातील तरतुदींच्या अंमलबजावणीनंतर शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट होणार आहे, मात्र, शेतकऱ्यांविषयी खोटा कळवळा असणारे विरोधक या विधेयकाबद्दल गैरसमज पसरवत आहेत. परंतु शेतकऱ्याला हे विधेयक सुखावणारे आहे. त्यामुळेच गावागावात शेतकऱ्यांनी गुढ्या उभ्या केल्या आहेत, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

कृषी विधेयकासंदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. श्री पाटील म्हणाले की, नव्या कृषी विधेयकाच्या मंजुरीने यापुढे शेतकरी आपला शेतीमाल कोठेही विकू शकतो. त्याला बाजार समितीचे बंधन असणार नाही. त्याची इच्छा असेल तर तो आपले शेत एखाद्या कंपनीला करार शेतीसाठी देऊ शकतो. हे सर्व शेतकऱ्यांच्या संमतीनेच होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पायातील बेड्या तुटल्या आहेत. विधेयकामुळे शेतकरी खऱ्या अर्थाने समृद्ध होणार आहे. २०२२ पर्यंत देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणे हा यामागचा उद्देश आहे. विरोधकांना मात्र, शेतकऱ्यांचे हित बघवत नाही त्यामुळे त्यांनी याला विरोध केला आहे.

शेतकऱ्यांचे हित जपणारे अशी शरद पवार यांची ओळख आहे. मात्र, शेतकरी हिताच्या इतक्‍या महत्त्वाच्या विधेयकावेळी ते सभागृहात उपस्थित का नव्हते? असा प्रश्‍न आहे. यावरून त्यांचे शेतकरी प्रेम किती आहे, हे दिसते. त्यांच्या पक्षाचे खासदारही राज्यसभेतून निघून गेले. या कृषी विधेयकातील बहुतांशी तरतुदी या एकेकाळी कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात होत्या. आता ते यालाच विरोध करत आहेत.
- चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्य क्ष, भाजप


इतर ताज्या घडामोडी
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
पुण्यात दसऱ्यानिमित्त फुलबाजार फुलला पुणे ः कोरोना संकटामुळे मार्चपासून सलग पाच...
सोयाबीनमध्ये तेजीचाच कलअकोला ः या हंगामातील सोयाबीन काढणी जोरात सुरू...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
औरंगाबादमध्ये कांदा सरासरी ३५०० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
राज्यातून मॉन्सून परतीच्या वाटेवर; पाऊस...महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या वाटेवर...
सांधेदुखी, सूजेवर आरोग्यदायी गोखरूगोखरू ही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. या वनस्पतीला...
शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न करु...सोलापूर : ‘‘अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतपिकांचे...
खानदेशात पावसाने दाणादाण सुरूचजळगाव ः खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात मध्यम...
जिगाव प्रकल्पग्रस्तांना मिळणार योग्य...बुलडाणा ः जिगाव प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला...
सोलापुरात नुकसानग्रस्तांसाठी `रयत’चे...सोलापूर : सोलापूरसह संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे...
साताऱ्यात रब्बीची १२ टक्के क्षेत्रावर...सातारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने झोडपल्याने...