agriculture news in Marathi SOP final of Shetishala Maharashtra | Agrowon

शेतीशाळांची ‘एसओपी’ निश्‍चित 

टीम अॅग्रोवन
रविवार, 9 मे 2021

शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या शेतीशाळांसाठी प्रमाणभूत पद्धत (एसओपी) निश्‍चित करण्यात आली आहे. तसेच खरीप हंगाम तोंडावर आल्यामुळे राज्यभर तातडीने शेतीशाळा सुरू करा.

पुणे ः शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या शेतीशाळांसाठी प्रमाणभूत पद्धत (एसओपी) निश्‍चित करण्यात आली आहे. तसेच खरीप हंगाम तोंडावर आल्यामुळे राज्यभर तातडीने शेतीशाळा सुरू करा, अशा सूचना कृषी आयुक्तालयाने दिल्या आहेत. 

राज्यातील सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (एसएओ) व विभागीय कृषी सहसंचालक (जेडीए) यांना यंदा शेतीशाळेची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे सांगण्यात आले आहे. शेतीशाळेमुळे शेतकऱ्यांना पीक नियोजन, व्यवस्थापन व उत्पादन वाढीसाठी फायदा होतो. त्यामुळे लागवडीच्या कालावधीपासून या उपक्रमाचे चांगले नियोजन करावे, असे आयुक्तालयाचे म्हणणे आहे. 

गेल्या हंगामात झालेल्या शेतीशाळांच्या धर्तीवरच योजनानिहाय नियोजन यंदाच्या शेतीशाळांचे करावे. त्यासाठी नव्या एसओपीचा वापर करावा, शेतीशाळा पीकनिहाय घ्याव्यात, त्यासाठी विषय व वेळापत्रकाचा वापर करावा, असे कृषी संचालक विकास पाटील (विस्तार व प्रशिक्षण) यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना कळविले आहे. 

‘‘राज्यात १५ मेपासून शेतीशाळा सुरू करण्याच्या सूचना आम्हाला कृषी आयुक्तालयाने दिल्या होत्या. तथापि, कोरोना साथीची प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात पसरला आहे. यामुळे क्षेत्रीय कर्मचारी यंदा शेतीशाळा सुरू करण्यासाठी अजिबात इच्छुक नाहीत. मुळात, ग्रामीण भागात खरोखर हा उपक्रम चालू आहे की नाही हे तपासण्यासाठी आमच्याकडे मनुष्यबळ देखील उपलब्ध नाही,’’ असे विदर्भातील एका ‘एसएओ’ने स्पष्ट केले. 

शेतीशाळा टाळता येणार नाही 
कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, ‘‘कोरोनाची स्थिती असली तरी हा उपक्रम कोणत्याही तालुक्याला टाळता येणार नाही. शेतीशाळा वेळेत सुरू झाल्या तरच शेतकऱ्यांना खरिपात लाभ होईल. शेतीशाळांसाठी गुगल फॉर्मचा वापर यंदा केला जाणार आहे. कोरोनाची स्थिती असली तरी हा उपक्रम कोणत्याही तालुक्याला टाळता येणार नाही.’’ 


इतर अॅग्रो विशेष
तुरळक ठिकाणी मुसळधार शक्य पुणे : कोकणसह राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस...
हा तर मत्स्य दुष्काळाच! जगातील आघाडीच्या ‘ब्लू इकॉनॉमी’मध्ये भारताचा...
कोकण, मराठवाड्यात जोरदार पावसाची हजेरी पुणे : राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कमी झाला...
पेरणीची घाई नको : कृषी आयुक्तालयपुणेः राज्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर...
मॉन्सूनला पोषक वातावरण पुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने प्रवास...
दूध दरातील कापतीने शेतकऱ्यांची परवड औरंगाबाद: महिनाभरातच दुधाच्या दरात तब्बल ११...
पीककर्ज व्याज सवलत योजनेचे पालकत्व...पुणेः शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने तीन...
राज्यातील प्रकल्पांमध्ये केवळ २१ टक्के...पुणे ः मे आणि जून महिन्यात पाण्याची मागणी...
कमी दराने कांदा खरेदी सुरूच नाशिक : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोयाबीन लागवड क्षेत्रात दहा टक्के...नागपूर : देशात सोयाबीन लागवड क्षेत्र आणि...
दूध दरासाठी गुरुवारी आंदोलन नगर : लॉकडाउनचा गैरफायदा घेत दूध उत्पादक...
विद्यापीठाच्या वाणांमुळे शेतकऱ्यांना ९५...नगर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित...
गांडुळखताचा लोकप्रिय केला शुभम ‘ब्रॅण्ड’सोलापूर जिल्हयातील उपळाई बुद्रूक येथील महादेव...
सिंधुदुर्गमध्ये मुसळधारसिंधुदुर्गनगरी : जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार...
प्रयोगशील, अभ्यासपूर्ण शेतीचा आदर्शतिडका (जि. औरंगाबाद) येथील युवा शेतकरी ईश्‍वर...
शेतकऱ्यांचे धान बोनसचे १७ कोटी रुपये...चंद्रपूर : गेल्या खरीप हंगामात विक्री केलेल्या...
मॉन्सून उद्या दिल्लीत पुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने उत्तरेत...
समुद्रातील माशांचा साठा केवळ ६६ टक्के...रत्नागिरी ः समुद्रातील माशांचा साठा कमी होत असून...
दीडपट हमीभावाचा केंद्राचा दावा फसवा पुणेः किमान आधारभूत किमतीच्या (एमएसपी) माध्यमातून...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाण्याची ...नाशिक : अनेक शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन पेरणीला...