धान उत्पादक गडचिरोलीत ज्वारीचे क्षेत्र वाढणार

गडचिरोली :धान उत्पादक अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात धान आणि चाऱ्याचा प्रश्‍न सुटावा, यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे.
Sorghum area will increase in paddy producing Gadchiroli
Sorghum area will increase in paddy producing Gadchiroli

गडचिरोली : धान उत्पादक अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात धान आणि चाऱ्याचा प्रश्‍न सुटावा, यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. केंद्र सरकारच्या भरडधान्य विकास योजनेतून ज्वारी लागवडीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. 

आंधप्रदेशमधील धान लागवडीनंतर रब्बी ज्वारी लागवडीचा प्रयोग करण्यात आला आहे. त्याला त्या भागातील शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसादही मिळाला. त्याच प्रकल्पाची अंमलबजावणी करुन धान्य आणि चारा उत्पादनाला कृषी विभागाकडून प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ९ लाखावर जनावरे असलेल्या या जिल्हयात दूधाचे संकलन अडीच हजारावरच थांबले आहे.  

वाळलेले गवत, पावसाळ्यात हिरवे गवत आणि धानाचे तणस असेच खाद्य जनावरांना दिले जाते. पोषक घटकांचा समावेश असलेले पशुखाद्य दिले जात नाही. पोषक चाऱ्याची उपलब्धता झाल्यास एक जनावर दोन ते चार लिटर दूध देईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे या भागात दूध संकलनातही वाढ होईल, अशी अपेक्षा कृषी विभागाला या प्रकल्पाच्या अंमलबजावणीतून आहे. 

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे म्हणाले, ‘‘२०-२५ वर्षांपूर्वी या भागात ज्वारी होत होती. जुन्या शेतकऱ्यांशी चर्चेत ही बाब समजली. त्याच आधारे पुन्हा ज्वारी लागवडीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला. नागपूर विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांनी या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केला.

दोन पाण्यावर येणारे हे पीक आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे देखील सहकार्य मिळत आहे. त्यांच्या माध्यमातून इरिगेशन डिपार्टमेंटला सांगून ज्वारी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना पाणी द्यावे, अशी सूचना केली जाणार आहे. रब्बी ज्वारीसाठी कृषी विद्यापीठाची देखील शिफारस आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com