agriculture news in marathi Sorghum in Aurangabad at Rs. 1800 to 2025 per quintal | Agrowon

औरंगाबादमध्ये ज्वारी १८०० ते २०२५ रुपये प्रतिक्विंटल

टीम अॅग्रोवन
रविवार, 10 मे 2020

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी (ता. ८) ज्वारीची ३४ क्विंटल आवक झाली. तिला किमान १८०० ते कमाल २०२५ रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीतर्फे देण्यात आली. शनिवारी (ता. ९) बाजार बंद राहिला. 

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी (ता. ८) ज्वारीची ३४ क्विंटल आवक झाली. तिला किमान १८०० ते कमाल २०२५ रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीतर्फे देण्यात आली. शनिवारी (ता. ९) बाजार बंद राहिला. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शुक्रवारी ३ क्विंटल आवक झालेल्या बाजरीला १७०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. मक्याची आवक २४० क्विंटल, तर दर किमान १०७५ ते कमाल ११५० रुपये प्रतिक्विंटल राहिले. तीन क्विंटल आवक झालेल्या हरभऱ्याला ३६०० ते ३८०० रुपये दर मिळाला. आंब्यांची आवक ८८ क्विंटल, तर दर ४००० ते ७००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ३४ क्विंटल आवक झालेल्या चिकूला ८०० ते २००० रुपये दर मिळाला. लिंबांची आवक २२ क्विंटल, तर दर २००० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ४२ क्विंटल आवक झालेल्या मोसंबीला ७०० ते १३०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. १५४ क्‍विंटल आवक झालेल्या टरबूजांचे दर ५०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. खरबुजाची आवक १४५ क्विंटल, तर दर ६०० ते ८०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. 

आल्याची १३ क्विंटल आवक झाली. त्यास किमान १००० ते कमाल ३५०० रुपये प्रति क्‍विंटलचा दर मिळाला. ७०० क्विंटल आवक झालेल्या बटाट्याला १३०० ते १८०० रुपये दर मिळाला. भेंडीची आवक ५५ क्विंटल, तर दर ८०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. २३ क्विंटल आवक झालेल्या फ्लॉवरला ५०० ते ६०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. गवारीची आवक १५ क्विंटल, तर दर ७०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ५५ क्विंटल आवक झालेल्या कैरीला ८०० ते १००० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. 

काकडीची आवक २९ क्विंटल, तर दर किमान ५०० ते कमाल ८०० रुपये प्रति क्विंटल राहिला. ६०१ क्विंटल आवक झालेल्या कांद्याला ५०० ते ८०० रुपये दर मिळाला. ६० क्विंटल आवक झालेल्या कोबीचे दर ३०० ते ४०० रुपये क्विंटल राहिले. लसणाची आवक ७२ क्विंटल, तर दर ३२०० ते ८ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ३० क्विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीला ७०० ते १००० रुपये दर मिळाला. 

शेवग्याला १००० ते ३००० रूपये दर 

शेवग्याची आवक २१ क्विंटल, तर दर किमान १००० ते कमाल ३००० हजार रुपये प्रति क्विंटल राहिले. १४ क्विंटल आवक झालेल्या दोडक्याला ७०० ते १००० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. टोमॅटोची आवक १४८ क्‍विंटल, तर दर ३०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. २० क्विंटल आवक झालेल्या वांग्यांना १००० ते १५०० रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचीची आवक ६३ क्विंटल, तर दर २००० ते २५०० रुपये प्रति क्विंटल राहिल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली. 
 

 
 


इतर बाजारभाव बातम्या
अकलूज येथील जनावरांचा बाजार बंदअकलूज, जि. सोलापूर : ‘‘अकलूज कृषी उत्पन्न...
कोल्हापुरात गुळाच्या नियमित आवकेस...कोल्हापूर : येथील बाजार समितीत गेल्या पंधरा...
जळगावात हिरवी मिरची १८०० ते २६०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात सुधारणानगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
कोल्हापुरात टोमॅटोला दहा किलोस १५० रुपयेकोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात...
कळमना बाजारात मोसंबी दरात सुधारणानागपूर : मागणीअभावी संत्रा दरात घसरण झाली आहे....
औरंगाबादमध्ये गाजर सरासरी १८०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत वाटाणा ३००० ते ४५०० रुपये परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात पेरू ३०० ते ३५०० रुपयेजळगावात २५०० ते ३५०० रुपये दर जळगाव : ः...
नाशिकमध्ये वांग्यांना सरासरी ३००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात भरताची वांगी १८०० ते २६०० रुपये जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
संत्राचे व्यवहार ११०० ते १४०० रुपये...नागपूर :  मागणीअभावी संत्रा दरातील तेजीची...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात हिरवी मिरची, गवार, घेवड्याला...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिर पुणे  : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबाद : हिरवी मिरची सरासरी ३०००...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत ढोबळी मिरचीची पंधरा क्विंटल आवकपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात हिरवी मिरची २००० ते ५००० रुपये...पुण्यात २००० ते ३००० रुपये पुणे : पुणे बाजार...
पपई दर निम्म्यावर; शेतकऱ्यांना फटका जळगाव : खानदेशात गेल्या २० ते २५ दिवसात...
मक्‍याच्या बाजारभावात दौंडमध्ये २००...दौंड, जि. पुणे : दौंड तालुक्‍यात मक्‍याची आवक...