हिंगोली जिल्ह्यात ज्वारी, हरभऱ्याने रानं बहरली

sorghum, green hawks emerge In the Hingoli district
sorghum, green hawks emerge In the Hingoli district

हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात ज्वारी, हरभरा या अन्नधान्य पिकांच्या पेरणी क्षेत्राने सर्वसाधारण क्षेत्राचा टप्पा ओलांडला. जिल्ह्यात सोमवार (ता. ३०) पर्यंत १ लाख ५६ हजार ६३४ हेक्टरवर (१०४.७१ टक्के) पेरणी झाली आहे. अजूनही काही भागात पेरणी सुरू आहे. त्यामुळे पेरणी क्षेत्रात वाढ होईल, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. सध्या रानांत हरभरा, ज्वारीची पिके बहरल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांचे सर्वासाधारण क्षेत्र १ लाख ४९ हजार ५८६ हेक्टर एवढे आहे. सर्वसाधारण क्षेत्रामध्ये ज्वारी १२ हजार ५१ हेक्टर, गहू ४४ हजार ४७० हेक्टर, रब्बी मका १ हजार १९ हेक्टर, हरभरा ७२ हजार ८५६ हेक्टर, तिळाचे २०० हेक्टर, जवसाचे १०० हेक्टर, करडईचे १८ हजार १८६ हेक्टर, सूर्यफुलाच्या २९५ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.

तृणधान्याचे सर्वसाधारण क्षेत्र ५८ हजार ४९ हेक्टर आहे. त्याची ८६.१९ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात शेतकऱ्यांनी धान्य तसेच कडबा असा दुहेरी फायदा लक्षात घेऊन ज्वारीला अधिक पसंती दिली आहे. त्यामुळे यंदा ज्वारीच्या पेरणी क्षेत्राने सर्वसाधारण क्षेत्राचा टप्पा पार केला.

कडधान्याचे सर्वसाधारण क्षेत्र ७३ हजार ५१ हेक्टर आहे. त्याची १४५.९३ टक्के पेरणी झाली आहे. त्यात हरभरा सर्वाधिक आहे. त्याचे सर्वसाधारण क्षेत्र ७२ हजार ८५६ हेक्टर आहे. प्रत्यक्षात १ लाख ६ हजार ५५२ हेक्टरवर (१४६.२५ टक्के) पेरणी झाली आहे.

अन्नधान्याचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ३१ हजार १०० हेक्टर आहे. त्याची ११९.४८ टक्के पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदा तृणधान्ये तसेच कडधान्य पिकांना पसंती दिली आहे. करडई, जवस, सूर्यफूल या गळीत धान्य पिकांची पेरणी क्षेत्र निरंक आहे. विहिरी, बोअर, तलाव, धरणे आदी सिंचन स्रोतांना पुरेशा प्रमाणात पाणी असल्याने यंदा रब्बी क्षेत्राने सर्वसाधारण क्षेत्राचा टप्पा पार केला.

हिंगोली तालुक्यात ९९.४४ टक्के क्षेत्रावर, कळमनुरी तालुक्यात ८२.२०  टक्के, वसमत तालुक्यात ३३.४६  टक्के, औंढानागनाथ तालुक्यात १४९.४४ टक्के, सेनगाव तालुक्यात ९९.९९  टक्के क्षेत्रावर पेरणी झाली.

  •    ५० हजार हेक्टरवर तृणधान्य
  •    १ लाख ६ हजार हेक्टरवर कडधान्य
  •    १ लाख  ५६ हजार हेक्टरवर अन्नधान्य
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com