न्याहळोद परिसरात ज्वारी, मका खरेदी केंद्रे बंद

न्याहळोद, जि. धुळे : न्याहळोद तसेच परिसरातील शेतकऱ्यांना मका विक्रीसाठी तासनतास उभे राहावे लागले. खरेदी बंद असल्याचे सांगून शेतकऱ्यांना माघारी पाठविण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
Sorghum in Nyahalod area, Maize shopping centers closed
Sorghum in Nyahalod area, Maize shopping centers closed

न्याहळोद, जि. धुळे : न्याहळोद तसेच परिसरातील शेतकऱ्यांना मका विक्रीसाठी तासनतास उभे राहावे लागले. पण, शासनाचे खरेदीसंबंधीचे टार्गेट पूर्ण झाले आहे. खरेदी बंद असल्याचे सांगून शेतकऱ्यांना माघारी पाठविण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. 

शासनाने नुकतीच भरड धान्य खरेदीसाठी मंजुरी दिली. शेतकऱ्यांना मका खरेदीचे संदेश देखील पाठवले होते. त्यानुसार शेतकरी धुळे येथील खरेदी केंद्रात मका घेऊन गेले. पण त्यांना माघारी पाठविले. मका खरेदी न करताच परत पाठविल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.

तलाठ्याकडे फेऱ्या मारून सातबारा उतारा घेतला. बँकेचे पासबुक, आधार कार्ड आदी कागदपत्र गोळा करून खरेदी केंद्रात नाव नोंदणी केली. बाजारात मक्याचे दर हमीभावापेक्षा कमी आहेत. पीक परवडेनासे झाले आहे. १२०० शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केली. पण, फक्त ३०० शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी केला आहे. यामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल पडून आहे.

उन्हाळ्यातही मक्याची शासनाने खरेदी केली नाही. तेव्हादेखील फटका बसला. आताही खरेदी न करताच मका केंद्रातून परत पाठविला. शासनाने मका खरेदीचा लक्ष्यांक वाढवावा व खरेदी पुन्हा सुरू करावी.   - दिलीप उपाध्ये, शेती विकास केंद्र संचालक, गटप्रमुख, न्याहळोद (जि.धुळे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com