agriculture news in marathi sorghum under temperature stress | Agrowon

ज्वारीवर चिकट्याचा प्रादुर्भाव

ॲग्रोवन वृत्तसेवा 
सोमवार, 11 जानेवारी 2021

नगर जिल्ह्यात काही भागात भुरभुर पाऊस झाला. चार दिवसांत बदलत्या वातावरणाचा ज्वारी, हरभरा व गव्हावर परिणाम होऊ लागला आहे.

नगर : जिल्ह्यात गेल्या चार ते पाच वर्षांपासून सातत्याने ढगाळ वातावरण आहे. अधून-मधून धुके पडत आहे. काही भागात भुरभुर पाऊस झाला. चार दिवसांत बदलत्या वातावरणाचा ज्वारी, हरभरा व गव्हावर परिणाम होऊ लागला आहे. नगर जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र असलेल्या ज्वारीवर मोठ्या प्रमाणात चिकटा, मावा पडला आहे. त्यामुळे ज्वारी काळी पडू लागली आहे. हरभऱ्यावरही घाटेअळीचा प्रादुर्भावाची भीती व्यक्त केली जात आहे. 

नगर जिल्ह्यात खरिपात पावसाने पिकांचे नुकसान झाले. चांगल्या पावसाने रब्बीची पिके चांगली येण्याची आशा होती. मात्र, पिकांवर नैसर्गिक संकटाची मालिका मात्र संपायला तयार नाही. गेल्या काही दिवसांपासून सतत बदलते वातावरण निर्माण होत असल्याने रब्बीतील पिकेही अडचणीत येऊ लागली आहे. जिल्हाभरात सर्वाधिक अडीच लाख हेक्टरवर ज्वारी आहे. ९० हजार हेक्टर हरभरा तर ८० हजार हेक्टरच्या जवळपास गव्हाची पेरणी झालीय. मात्र, पोषक वातावरण नसल्याने ही पिके अडचणीत येऊ लागली आहेत. 

पिकांसाठी पोषक असलेली थंडी गेल्या आठवड्यापासून गायब झाल्याने व पहाटेच्या वेळी धुके पडू लागल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. ज्वारीवर मावा, चिकटा पडल्याने ज्वारी काळी पडलीय, हरभऱ्यावर घाटेअळी पडण्याचा धोका वाढलाय. भाजीपाल्यावरही परिणाम दिसून येत आहे. शेतकऱ्यांची पिकावरील रोगराईमुळे फवारणीसाठी धावपळ सुरू झाली आहे. त्यामुळे पिकांवरील खर्चातही वाढ झाली आहे. एका फवारणीसाठी एकरी ज्वारीसाठी ३०० ते ५०० रुपये तर गहू हरभऱ्यासाठी ५०० ते १ हजार रुपयांपर्यंत खर्च येत आहे. 

कृषी विभाग दखल कधी घेणार? 
रब्बीतील ज्वारी, हरभरा, गहू यासह इतर पिकांवर कमी जास्त प्रमाणावर विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करणे, आवश्यक ती औषधे उपलब्ध करून देत प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची कृषी विभागाची जबाबदारी आहे. कापडावरील बोंडअळी रोखण्यासाठी कृषी विभागाने मोठा निधी खर्च करून ही बोंडअळी रोखता आली नसल्याने कापसाचे मोठे नुकसान झाले आणि कृषी विभागाचा निधीही वाया गेल्यासारखे झाले. आता रब्बीतील पिकांवरही होणारा रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेणे गरजेचे असताना मात्र तसे होताना दिसत नाही.


इतर अॅग्रो विशेष
तुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५...कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी)...
टीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही...नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
ढगफुटीने हाहाकारपुणे : पश्‍चिम महाराष्ट्रात मॉन्सूनच्या पावसाने...
सांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर सांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू...
पीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान...पुणे ः राज्याच्या काही भागात अतिवृष्टी, पुराने...
कोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही...
तेवीस वर्षीय युवकाची पोल्ट्रीत दमदार...शिवपूर (जि. अकोला) येथील शुभम महल्ले या तरुणाने...
शेतीसह डाळी, बेसन पीठ प्रक्रिया ठरली...करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सुधीर...
शेतकऱ्यांच्या प्रश्नी संसद दणाणली;...नवी दिल्ली ः संसदेत गुरुवारी (ता.२२) शेतकरी...
‘शेतकरी संसदे’त कृषी कायद्यांवर हल्लाबोलनवी दिल्ली  : जंतर-मंतर येथे संयुक्त किसान...
महाबळेश्वरात ४८० मिलिमीटर पाऊस !!!सातारा ः महाबळेश्वरात मुसळधार पाऊस सुरू आहे....
रत्नागिरीत पावसाचे थैमानरत्नागिरी ः जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसारख्या...
‘मुळशी’च्या पाणलोट क्षेत्रात ३७०...पुणे ः जिल्ह्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती गंभीरसिंधुदुर्गनगरी ः जिल्हयात मध्यरात्रीपासून...
मराठवाड्यात तब्बल ७७ मंडलात अतिवृष्टी औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता.२२)...
सोमवारपर्यंत ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा...पुणे : गेल्या काही दिवसांपासून कोकणासह, मध्य...
राज्यात अतिवृष्टीने दाणादाण पुणे : कोकणातील सर्वंच जिल्ह्यांसह राज्यातील काही...
राज्याची कृषी विधेयके लोकाभिप्रायासाठी...पुणे ः महाविकास आघाडी सरकारने नव्या कृषी...
लॉन’ शेतीत मिळवली चांदे गावाने ओळखपुणे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या प्रसिद्ध...