Agriculture news in Marathi Sow on 4.5 lakh hectares in Nagar district | Agrowon

नगर जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर पेरा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 जुलै 2020

नगर ः यंदा रोहिणी, मृग, आर्द्रा नक्षत्रांमध्ये पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. परिणामी, जूनच्या दुसऱ्या आठवड्यातच जिल्ह्यात खरिपाचा पेरा सुरू झाला. आजअखेर जिल्ह्यात ४ लाख ५३ हजार ३९५ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झाली.

नगर ः यंदा रोहिणी, मृग, आर्द्रा नक्षत्रांमध्ये पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. परिणामी, जूनच्या दुसऱ्या आठवड्यातच जिल्ह्यात खरिपाचा पेरा सुरू झाला. आजअखेर जिल्ह्यात ४ लाख ५३ हजार ३९५ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झाली. जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत १०१ टक्के पेरणी पूर्ण झाली. बहुतांश ठिकाणी आंतरमशागतीची कामे सुरू झाली आहेत.

नगर जिल्ह्यात मृगानेही जिल्ह्यात जोरदार बरसात केली. काही महसूल मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. खरिपासाठी महत्त्वाचे मानले जाणारे मृग नक्षत्र बरसल्याने उडीद, मूग, तूर, सोयाबीन, कापूस, बाजरीच्या पेरणीसाठी तिफण फिरू लागली. त्यानंतर आर्द्रा नक्षत्रातही कमी-अधिक प्रमाणात पाऊस कोसळला. त्यामुळे जूनमध्येच खरिपाच्या पेरणीने वेग घेतला.

आजअखेर जिल्ह्यात ४ लाख ५३ हजार ३९५ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झाली. कृषी विभागाच्या अंदाजानुसार ४ लाख ४७ हजार ९०० हेक्‍टरवर खरिपाची पेरणी अपेक्षित होती. सरासरीच्या तुलनेत कृषी विभागाच्या अहवालानुसार, आत्तापर्यंत खरिपात१०१ टक्के पेरणी झाली. दरम्यान, खरिपाची पेरणी वेळेवर झाल्याने शिवारात समाधानाचे वातावरण आहे. कोळपणी, खुरपणी, डवरणीद्वारे आंतरमशागतीची कामे सुरू आहेत.

भरारी पथके नेमकं करतात काय
खते, बियाण्यांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागातर्फे १५ भरारी पथके नियुक्त केली आहेत. मात्र, जिल्ह्याच्या अनेक भागांत खते देण्यास शेतकऱ्यांना टाळाटाळ केली जात आहे. दोन दिवसांपूर्वीच शेवगाव तालुक्यात शेतकऱ्यांची खतासाठी होणारी पिळवणूक थांबली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा अॅड. शिवाजीराव काकडे यांनी दिला आहे. खताबाबत शेतकऱ्यांची अडवणूक होत असेल तर प्रशासनाने नियुक्त केलेले भरारी पथके नेमके काय करतात असा प्रश्न उपस्थित होत आहेत.


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...
इगतपुरी, नाशिक तालुक्यात वाऱ्यामुळे...नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या...
विक्रीअभावी मालवंडीत लिंबू उत्पादकांना...मालवंडी, जि. सोलापूर ः बार्शी तालुक्यातील मालवंडी...
सफेद चिप्पी कांदळवन वृक्ष घोषितमुंबई: सफेद चिप्पी (sonneratia alba) या कांदळवन...
यंदा बैल पोळा उत्साहात साजरा होणार रोपळे बुद्रूक , ता.पंढरपूर , जि . सोलापूर...
हलक्‍या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍...महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात बदल होत असून,...
औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...