Agriculture news in Marathi Sow on 7.5 lakh hectares in Nanded district | Agrowon

नांदेड जिल्ह्यात साडेसात लाख हेक्टरवर पेरा

टीम अॅग्रोवन
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

नांदेड जिल्ह्यातील खरिपाच्या पेरणी क्षेत्राने सर्वसाधारण क्षेत्राचा टप्पा पार केला आहे. बुधवार (ता. २९) पर्यंत ७ लाख ५५ हजार १८ हेक्टरवर (१०१.६४ टक्के) पेरणी झाली आहे. यंदाच्या खरिपातील जिल्ह्यातील एकूण पेरणी क्षेत्रापैकी सोयाबीनचे पेरणी क्षेत्र ५०.५१ टक्के आहे.

नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील खरिपाच्या पेरणी क्षेत्राने सर्वसाधारण क्षेत्राचा टप्पा पार केला आहे. बुधवार (ता. २९) पर्यंत ७ लाख ५५ हजार १८ हेक्टरवर (१०१.६४ टक्के) पेरणी झाली आहे. यंदाच्या खरिपातील जिल्ह्यातील एकूण पेरणी क्षेत्रापैकी सोयाबीनचे पेरणी क्षेत्र ५०.५१ टक्के आहे. एकूण कडधान्य आणि गळित धान्य पिकांची पेरणी सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा अधिक झाली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली.

यंदाच्या खरीप हंगामातील पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख ४२ हजार ८६१ हेक्टर प्रस्तावित करण्यात आले होते. बुधवार (ता. २९) पर्यंतच्या पेरणी क्षेत्रामध्ये ज्वारीची ५३ हजार २५० पैकी ३१ हजार ४८१ हेक्टरवर (५९.१२ टक्के), बाजरीची ३३ पैकी २१ हेक्टर (६३.६४ टक्के), मक्याची ६४९ पैकी ६९१ हेक्टरवर (१०६.४७ टक्के), भाताची ८५८ पैकी ९२० हेक्टर (१०७.२३ टक्के) , तुरीची ६० हजार ७८८ पैकी ७२ हजार ५१०  हेक्टर (११९.२८ टक्के), मुगाची २६ हजार ८९३ पैकी २५ हजार ८५९  हेक्टर (९६.१६ टक्के), उडदाची २८ हजार ६०८ पैकी २६ हजार ९४२ (९४.१८ टक्के), सोयाबीनची ३ लाख ९ हजार ३७५ पैकी ३ लाख ८१ हजार ३७३ हेक्टर (१२३.२७ टक्के), तिळाची ७९९ पैकी ४५५ हेक्टर (५६.९५ टक्के), कारळाची ४७१ पैकी २८२ हेक्टर (५९.८७ टक्के) समावेश आहे.

कपाशीची २ लाख ६० हजार ५०५ पैकी २ लाख १४ हजार ४१० हेक्टर (८२.३१ टक्के) लागवड झाली आहे. तृणधान्याची एकूण ३३ हजार ११३ हेक्टरवर (६०.१६ टक्के), कडधान्यांची १ लाख २५ हजार ३११ हेक्टर (१०७.६१ टक्के), गळित धान्यांची ३ लाख ८२ हजार १८४ हेक्टरवर (१२२.९४ टक्के) पेरणी झाली आहे. अर्धापूर, मुदखेड, धर्माबाद, देगलूर, बिलोली, मुखेड, कंधार, लोहा या आठ तालुक्यांमध्ये सर्वसाधारण क्षेत्रा पेक्षा अधिक हिमायतनगर तालुक्यात सर्वसाधारण क्षेत्राएवढी  पेरणी झाली आहे. इतर सहा तालुक्यांमध्ये ९६.३३ ते ९७.०४ टक्के पेरणी झाली आहे.

तालुकानिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)
तालुका सर्वसाधारण क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी
नांदेड २५७३६ २५४९७ ९९.०७
अर्धापूर १९२७१ १९५७३ १०१.५७
मुदखेड १८८२२ १९५११ १०३.६६
हदगाव ८०२२३ ७८०६९ ९७.३१
माहूर ३३८१६ ३३३५८ ९८.६५
किनवट ७७१५६ ७६८१५ ९९.५६
हिमायतनगर ३३७९० ३३७९० १००.००
भोकर ४७२६९ ४५५३२ ९६.३३
उमरी ३१७१३ ३१५३२ ९६.३३
धर्माबाद २७९८१ २८९८७ १०३.६०
नायगाव ४६५४९ ४५१७० ९७.०४
बिलोली ४४८७१ ४६७२७ १०४.१४
देगलूर ५०४१८ ५८१७९ ११५.३९
मुखेड ७५४०९ ७६५७९०० १०१.४९
कंधार ६०३४२ ६४९९५ १०७.७१
लोहा ६९४९५ ७०७७३ १०१.८४

 


इतर ताज्या घडामोडी
सामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण...शंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त...
सोलापुरात कांद्याला सरासरी २१०० रुपयेसोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात कांद्याचे सौदे शेतकऱ्यांनी...कोल्हापूर : कांद्याच्या दरात घसरण झाल्याने...
बार्शी तालुक्‍यात सोयाबीनचे मोठे नुकसानवैराग, जि. सोलापूर : बार्शी तालुक्‍यात...
`पांगरी परिसरातील पीक नुकसानीचा अहवाल...पांगरी : पांगरी (ता.बार्शी) भागात गेल्या दहा,...
परभणी जिल्ह्यात दीड लाख हेक्टर कपाशी...परभणी : यंदाच्या खरिप हंगामात जिल्ह्यात ५ लाख १९...
खानदेशात सव्वालाख क्विंटल हरभरा...जळगाव : खानदेशात रब्बी हंगामाची तयारी लवकरच सुरू...
खानदेशात केळीची उधारीने खरेदीजळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची पुन्हा कमी दरात...
साखर कारखान्यांनी कामगारांची जबाबदारी...कोल्हापूर : राज्यातील साखर कामगारांची आरोग्याची...
नाशिक जिल्ह्यात पिकांचे ३७ हजार...नाशिक : चालू महिन्याच्या मध्यापासून जिल्ह्यात...
मराठवाड्यात पाऊस खरीप पिकांची पाठ सोडेनाऔरंगाबाद : जिल्ह्यात बहुतांश भागात हलका ते जोरदार...
मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्याची पीक...औरंगाबाद ः मराठवाड्यात खरीप पीक कर्जवाटपात...
कांदा निर्यातबंदी उठवा; नगर जिल्हा...नगर : केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय...
लातूर विभागात १५ लाख हेक्टरवर रब्बीचे...लातूर : येथील विभागीय कृषी सहसंचालक...
नांदेडमध्ये पावसाने ८३ हजार हेक्टर...नांदेड : अतिवृष्टी, पूरामुळे जिल्ह्यातील...
वऱ्हाडात पावसाचा पुन्हा धुमाकूळअकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशीम या...
शेतकरी विधवांकडून कंगना राणावतच्या...यवतमाळ : केंद्र सरकारच्या कृषी संबंधित नव्या...
सिंधुदुर्गाच्या काही भागात मुसळधार सुरूचसिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा जोर...
सांगलीत रब्बीसाठी ३३ हजार क्विंटल बियाणेसांगली ः सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह...
निळवंडे धरण तुडुंबअकोले, जि. नगर : उत्तर नगर जिल्ह्याला वरदान...