उगवणशक्ती तपासून घरचे सोयाबीन बियाणे पेरा ः सोनुने

जालना: ‘‘शेतकऱ्यांनी सोयाबीनचे घरचेच बियाणे स्वच्छ करून व उगवणशक्ती तपासून पेरावे,’’ असा सल्ला खरपुडी कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक एस. व्ही. सोनुने यांनी दिला.
Sow homemade soybean seeds after checking germination: Sonune
Sow homemade soybean seeds after checking germination: Sonune

जालना : ‘‘शेतकऱ्यांनी सोयाबीनचे घरचेच बियाणे स्वच्छ करून व उगवणशक्ती तपासून पेरावे,’’ असा सल्ला खरपुडी कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक एस. व्ही. सोनुने यांनी दिला. 

लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर खरपुडी केव्हीके, जालना येथील शास्त्रज्ञांनी रिलायन्स फाउंडेशनतर्फे डायल आउट कॉन्फरन्सद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या संवादात यामध्ये शेतीमधील विविध समस्या, कीड व रोग व्यवस्थापन, फळबाग व्यवस्थापन, अन्न-प्रक्रिया, या काळात शेती करताना घ्यावयाची काळजी, खरीप हंगामाची पूर्व तयारी, याविषयी डॉ.सोनुने, मृदा शास्त्रज्ञ राहुल चौधरी, पीक संरक्षण तज्ञ अजय मिटकरी व अन्नतंत्रज्ञान तज्ञ शशिकांत पाटील यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. 

विलास पवार, अनिल देशमुख, रामकृष्ण वाघमारे, सौरभ गुजर, विकास शिंदे, रामकीसन वाघमारे आदी शेतकऱ्यांनी सोयबीनच्या चांगल्या जाती कोणत्या, कपाशीवर बोंडअळी येऊ नये म्हणून काय उपाययोजना कराव्या, मक्यांनंतर कापूस लावायला चालेल का, गव्हानंतर कापूस घ्यावा की सोयाबीन, निंबोळी अर्कचा वापर कसा करावा आदी प्रश्न विचारले. 

त्याचे तज्ञांनी समर्पक उत्तरे देऊन समाधान केले. आयोजन फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक मनोज काळे यांनी केले. यशस्वीतेसाठी कार्यक्रम सहाय्यक रामा राऊत यांनी प्रयत्न केले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com