कोंबड्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी प्रमाणात असेल, तसेच समतोल आहार, शुद्ध हवेची कमतरता,
अॅग्रो विशेष
मराठवाड्यात नऊ लाख हेक्टरवर रब्बी पेरणी
लातूर : अतिपावसाने खरीप पिके हातची गेलेल्या मराठवाड्यात रब्बीची ९ लाख ५ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यामध्ये औरंगाबाद विभागातील तीन जिल्ह्यांतील ३ लाख ५२ हजार ८५४ हेक्टरसह लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांमधील ५ लाख ५२ हजार ८२२ हेक्टरवरील रब्बी पिकांचा समावेश आहे.
लातूर : अतिपावसाने खरीप पिके हातची गेलेल्या मराठवाड्यात रब्बीची ९ लाख ५ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यामध्ये औरंगाबाद विभागातील तीन जिल्ह्यांतील ३ लाख ५२ हजार ८५४ हेक्टरसह लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांमधील ५ लाख ५२ हजार ८२२ हेक्टरवरील रब्बी पिकांचा समावेश आहे.
यंदा औरंगाबाद कृषी विभागांतर्गत औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र ८ लाख ५ हजार २८६ हेक्टर आहे. नोव्हेंबरअखेरपर्यंत त्यापैकी ३ लाख ५२ हजार ८२४ हेक्टरवर पेरणी झाली. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील ४८ हजार ९७० हेक्टर, जालना ९३६७० हेक्टर; तर बीड जिल्ह्यातील २ लाख १० हजार २१४ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.
लातूर कृषी विभागांतर्गत पाच जिल्ह्यांत यंदा रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र ११ लाख १४ हजार २३० हेक्टर आहे. त्यातुलनेत ५ लाख ५२ हजार ८२२ हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ४९ टक्के पेरणी आटोपलेल्या पाचही जिल्ह्यांतील क्षेत्रामध्ये लातूर जिल्ह्यातील १ लाख ७८ हजार ६८७ हेक्टर, उस्मानाबाद १ लाख ८१ हजार ६२४ हेक्टर, नांदेड ३९ हजार २३३ हेक्टर, परभणी १ लाख ४ हजार ७१० हेक्टर; तर हिंगोली जिल्ह्यातील ४८ हजार ५६८ हेक्टर क्षेत्राचा समावेश असल्याची माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली.
खरीप हातचा गेल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या सर्व आशा आता रब्बीवर अवलंबून आहेत. नोव्हेंबरअखेरपर्यंत पेरणीची गती मंदच दिसते आहे. अतिपावसामुळे वापसास्थिती नसणे, याशिवाय खरीप हातचा गेल्याने पेरणीची सोय नसणे, याचाही परिणाम पेरणीवर दिसत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पावसामुळे जमिनीत ओल व पाण्याची उपलब्धता आहे. शेतकऱ्यांची भिस्त आता रब्बीवरच आहे.
विभाग, पीकनिहाय क्षेत्र (हेक्टरमध्ये)
लातूर कृषी विभाग (पाच जिल्हे)
रब्बी ज्वारी | १८२११९ |
गहू | २१९४६ |
मका | ३९४४ |
इतर तृणधान्य | १७९ |
हरभरा | ३३५३१५ |
इतर कडधान्य | ३४५ |
करडई | ७९६५ |
जवस | ३४८ |
सूर्यफूल | १७४ |
इतर गळीतधान्य | ४०७ |
औरंगाबाद कृषी विभाग (तीन जिल्हे)
रब्बी ज्वारी | २०५३४४ |
गहू | ३९५०१ |
मका | ७९३९ |
इतर तृणधान्य | १४८४८ |
हरभरा | ९९३५५ |
करडई | ३५६ |
जवस | ५१ |
सूर्यफूल | ३ |
इतर गळीतधान्य | १८ |
- 1 of 435
- ››