Agriculture news in marathi Sow over nine lakh hectares in Marathwada | Agrowon

मराठवाड्यात नऊ लाख हेक्‍टरवर रब्बी पेरणी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 डिसेंबर 2019

लातूर : अतिपावसाने खरीप पिके हातची गेलेल्या मराठवाड्यात रब्बीची ९ लाख ५ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. त्यामध्ये औरंगाबाद विभागातील तीन जिल्ह्यांतील ३ लाख ५२ हजार  ८५४ हेक्‍टरसह लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांमधील ५ लाख ५२ हजार ८२२ हेक्‍टरवरील रब्बी पिकांचा समावेश आहे. 

लातूर : अतिपावसाने खरीप पिके हातची गेलेल्या मराठवाड्यात रब्बीची ९ लाख ५ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. त्यामध्ये औरंगाबाद विभागातील तीन जिल्ह्यांतील ३ लाख ५२ हजार  ८५४ हेक्‍टरसह लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांमधील ५ लाख ५२ हजार ८२२ हेक्‍टरवरील रब्बी पिकांचा समावेश आहे. 

यंदा औरंगाबाद कृषी विभागांतर्गत औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र ८ लाख ५ हजार २८६ हेक्‍टर आहे. नोव्हेंबरअखेरपर्यंत त्यापैकी ३ लाख ५२ हजार ८२४ हेक्‍टरवर पेरणी झाली. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील ४८ हजार ९७० हेक्‍टर, जालना ९३६७० हेक्‍टर; तर बीड जिल्ह्यातील २ लाख १० हजार २१४ हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे. 

लातूर कृषी विभागांतर्गत पाच जिल्ह्यांत यंदा रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र ११ लाख १४ हजार २३० हेक्‍टर आहे. त्यातुलनेत ५ लाख ५२ हजार ८२२ हेक्‍टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ४९ टक्‍के पेरणी आटोपलेल्या पाचही जिल्ह्यांतील क्षेत्रामध्ये लातूर जिल्ह्यातील १ लाख ७८ हजार ६८७ हेक्‍टर, उस्मानाबाद १ लाख ८१ हजार ६२४ हेक्‍टर, नांदेड ३९ हजार २३३ हेक्‍टर, परभणी १ लाख ४ हजार ७१० हेक्‍टर; तर हिंगोली जिल्ह्यातील ४८ हजार ५६८ हेक्‍टर क्षेत्राचा समावेश असल्याची माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली. 

खरीप हातचा गेल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या सर्व आशा आता रब्बीवर अवलंबून आहेत. नोव्हेंबरअखेरपर्यंत पेरणीची गती मंदच दिसते आहे. अतिपावसामुळे वापसास्थिती नसणे, याशिवाय खरीप हातचा गेल्याने पेरणीची सोय नसणे, याचाही परिणाम पेरणीवर दिसत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पावसामुळे जमिनीत ओल व पाण्याची उपलब्धता आहे. शेतकऱ्यांची भिस्त आता रब्बीवरच आहे. 

विभाग, पीकनिहाय क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)

लातूर कृषी विभाग (पाच जिल्हे)

रब्बी ज्वारी  १८२११९
गहू २१९४६
मका   ३९४४
इतर तृणधान्य  १७९
हरभरा ३३५३१५
इतर कडधान्य  ३४५
करडई ७९६५
जवस  ३४८
सूर्यफूल १७४
इतर गळीतधान्य ४०७

औरंगाबाद कृषी विभाग (तीन जिल्हे)

रब्‌बी ज्‌वारी २०५३४४
गहू  ३९५०१
मका ७९३९
इतर तृणधान्य १४८४८
हरभरा ९९३५५
करडई ३५६
जवस ५१
सूर्यफूल
इतर गळीतधान्य १८

 


इतर बातम्या
कांदा दरप्रश्नी लासलगाव येथे आंदोलननाशिक : केंद्र शासनाने केलेली कांदा निर्यातबंदी...
सुमन चंद्रा बुलडाण्याच्या...बुलडाणा : जिल्ह्याला सलग दुसऱ्यांदा महिला...
तूर पिकावरील किडींचे व्यवस्थापन करावे ः...बुलडाणा  : तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या...
नाशिकमधील पीडित महिलांसाठी ‘सखी’...नाशिक : ‘‘समाजात वावरताना महिलांना अनेक...
...अखेर जायकवाडीतून रब्बी सिंचनासाठी...औरंगाबाद : जायकवाडी प्रकल्पावरून कालव्या‌द्वारे...
अकरा महिन्यांनंतर पिकांची नुकसानभरपाईपुणे ः पिकांची नुकसानभरपाई मिळत नसल्याचे अनुभव...
सांगलीत आडसाली उसाला महापुराचा फटकासांगली : जुलै आणि ऑगस्ट महिन्यात आलेल्या...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात एक लाख...बीड : यंदाच्या रब्बीत औरंगाबाद, जालना व बीड या...
परभणी येथे दूध संकलनातील घट सुरूचपरभणी : शासकीय दूध योजनेतंर्गंत परभणी येथील दुग्ध...
सातारा : ‘शेतकरी सन्मान’चा निधी मिळालाच...सातारा ः पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या...
नांदेड, परभणी, हिंगोलीत निर्बंधमुक्ती...नांदेड, परभणी, हिंगोली ः शेतकरी संघटनेतर्फे शरद...
सोलापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री...सोलापूर : राज्यात शासकीय नोकऱ्यांचे प्रमाण कमी...
घरात बसणार नाही, राज्यभर दौरा काढणार ः...परळी, जि. बीड : ‘‘बंड केले नसते तर देशाला...
खातेदारांच्या नोंदीसाठी ‘ई-हक्क’ प्रणालीनगर ः वारस नोंद, बोजा, गहाणखत, बोजा कमी करणे, ई-...
सर्वसामान्य, तरुण पिढीशी माझी बांधीलकी...मुंबई ः आपली बांधीलकी सर्वसामान्य माणसाशी,...
पीकविमा योजनेत कंपनी आणि शेतकऱ्यांमध्ये...अकोला ः गेल्या काही वर्षांत प्रत्येक हंगामातील...
शेतकऱ्यांना अपेक्षित राज्य कारभार करेन...शिवनेरी, जि. पुणे : शिवरायांच्या महाराष्ट्राचा...
आकस्मिकता निधीच्या मर्यादेत तात्पुरत्या...मुंबई : महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या...
निर्यातक्षम द्राक्षनोंदणीला मुदतवाढनाशिक : युरोपियन देशांना द्राक्ष निर्यातीकरिता ''...
खासगी प्रवासी बसमधून शेतमाल वाहतुकीला...सोलापूर : राज्याच्या ग्रामीण भागातून मुंबई,...