नगर जिल्ह्यात तुरीचा ५४ हजार हेक्टरवर पेरा

जिल्हाभरात गतवर्षीच्या तुलनेत सुमारे बावीस हजार हेक्टर तुरीचे क्षेत्र वाढले आहे. गेल्यावर्षी ३३ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा आत्तापर्यंत ५४ हजार हेक्टरवर तुरीची पेरणी झाली आहे. जिल्ह्यामधील सुमारे दहा तालुक्यांत क्षेत्र वाढ झाली आहे.
Sow turi on 54 thousand hectares in Nagar district
Sow turi on 54 thousand hectares in Nagar district

नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला असल्याने यंदा जिल्हाभरात गतवर्षीच्या तुलनेत सुमारे बावीस हजार हेक्टर तुरीचे क्षेत्र वाढले आहे. गेल्यावर्षी ३३ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा आत्तापर्यंत ५४ हजार हेक्टरवर तुरीची पेरणी झाली आहे. जिल्ह्यामधील सुमारे दहा तालुक्यांत क्षेत्र वाढ झाली आहे.

जिल्ह्यात गेल्यावर्षी तुरीचे सरासरी १२ हजार ०१८ हेक्टर क्षेत्र होते. त्यावेळी ३३ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. त्याची टक्केवारी होती २७४ टक्के. यंदा सरासरी क्षेत्रात वाढ करून ते १५ हजार १२१ हेक्टर केले. मात्र, यंदा आत्तापर्यंत ५४ हजार म्हणजे सरासरीच्या ३५६ टक्के विक्रमी पेरणी क्षेत्र झाले आहे. यंदाच्या खरिपात टक्केवारीत सर्वाधिक पेरणी तुरीची झाली आहे.

गेल्यावर्षीचा विचार करता तब्बल २२ हजार हेक्टर तुरीचे यंदा क्षेत्र वाढले आहे. नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा या आठ तालुक्यात क्षेत्रात वाढ झाली आहे तर राहुरी, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर व राहाता तालुक्यात मात्र यंदा क्षेत्र घटले आहे. अकोले तालुक्यात मात्र तुरीची पेरणी होत नाही. गेल्यावर्षी झाली नव्हती, यंदाही झाली नाही.

तालुकानिहाय पेरणी क्षेत्र (कंसात गतवर्षीचे क्षेत्र) ः नगर ः ३४०९ (११४४), पारनेर ः २३३६ (१०५२), श्रीगोंदा ः १९१६ (२१४३), कर्जत ः १४,६३१ (८,४५१), जामखेड ः ११,३४४ (७,६७८), शेवगाव ः ८,६७६ (३,४६६), पाथर्डी ः ८,३५४ (६,१३२), नेवासा ः २,४८२ (१,७०७), राहुरी ः २२० (३६४), संगमनेर ः १७९ (३३९), कोपरगाव ः १३१ (१६१), श्रीरामपूर ः ३९ (११२), राहाता ः २५१ (२३६).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com