नांदेड, परभणी, हिंगोलीत खरिपात कमी पेरणी : कृषी विभाग

नांदेड, परभणी, हिंगोलीत सोळा लाख हेक्टवर पेरणी
नांदेड, परभणी, हिंगोलीत सोळा लाख हेक्टवर पेरणी

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र १७ लाख १३ हजार २८३ हेक्टर असताना यंदा प्रत्यक्षात १६ लाख ५० हजार ७९५ हेक्टवर पेरणी झाली होती. सोयाबीन वगळता कपाशी तसेच अन्नधान्य, कडधान्य पिकांच्या क्षेत्रात घट झाली आहे.

कृषी विभागाकडून यंदाच्या खरीप हंगामातील अंतिम पेरणीक्षेत्र नुकतेच निश्चित करण्यात आले. या तीन जिल्ह्यात सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र ४ लाख ७४ हजार ५४० हेक्टर असताना प्रत्यक्षात ८ लाख ६१ हजार १९७ हेक्टवर पेरणी झाली आहे. सोयाबीनचा पेरा ३ लाख ८६ हजार ६५४ हेक्टरने वाढला आहे.कपाशीची ४ लाख ८६ हजार ४ हेक्टरवर लागवड झाली आहे. कपाशीच्या क्षेत्रात १ लाख २९ हजार ६५९ हेक्टरने घट झाली आहे.

नांदेड जिल्ह्यात सरासरी क्षेत्र ८ लाख ५ हजार ४७२ हेक्टर असताना प्रत्यक्षात ७ लाख ३२१ हेक्टवर खरिपाची पेरणी झाली आहे. उर्वरित ३५ हजार १५१ हेक्टर क्षेत्रावर हळद, ऊस आदी पिकांची लागवड झाली आहे. सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ९९ हजार ८९ हेक्टर असताना यंदा प्रत्यक्षात ३ लाख ७९ हजार ३३१ हेक्टवर पेरणी झाली आहे. कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख २३ हजार ७५४ हेक्टर असताना प्रत्यक्षात २ लाख ३९ हजार ८५३ हेक्टरवर लागवड झाली आहे. तुरीचे सर्वसाधारण क्षेत्र ६९ हजार ८९८ हेक्टर असताना प्रत्यक्षात ५९ हजार ७१३ हेक्टरवर पेरणी झाली. मुगाची २६ हजार ४५१ हेक्टर, उडदाची २ हजार ९१० हेक्टर, ज्वारीची ३२ हजार ८४५ हेक्टर, बाजरीची १८ हेक्टर, भाताची ९१८ हेक्टरवर, मक्याची ६३९ हेक्टर, कारळ ३५१ हेक्टर, तीळ ६६८ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

परभणी जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ५ ला २३ हजार ३६१ हेक्टर असताना प्रत्यक्षात ५ लाख ३१ हजार ५९६ हेक्टवर पेरणी झाली आहे. सरासरी क्षेत्रापेक्षा ८ हजार २३५ हेक्टरने पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे. सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र ८८ हजार ६७० हेक्टर असताना प्रत्यक्षात २ लाख ४५ हजार ४१ हेक्टवर पेरणी झाली. कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ९ हजार ५०० हेक्टर असताना प्रत्यक्षात १ लाख ९९ हजार ८६९ हेक्टरवर लागवड झाली. तुरीचे सर्वसाधारण क्षेत्र ६२ हजार ७०२ हेक्टर असताना प्रत्यक्षात ४२ हजार ९४७ हेक्टरवर पेरणी झाली.

हिंगोली जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ८४ हजार ४५० हेक्टर असताना प्रत्यक्षात ३ लाख ४८ हजार ८७८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. उर्वरित ३५ हजार ७७२ हेक्टरवर हळद आदी पिकांची लागवड झाली आहे. सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ८८ हजार ७८१ हेक्टर असताना प्रत्यक्षात २ लाख ३६ हजार ८२९ हेक्टरवर पेरणी झाली. कपाशीचे सरासरी क्षेत्र ८२ हजार २३१ हेक्टर असताना प्रत्यक्षात ४६ हजार २८२ हेक्टवर पेरणी झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com