Agriculture news in Marathi, Sowing of 2.5 lakh hectare in Nanded district | Agrowon

नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर पेरणी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 15 जुलै 2019

नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात गुरुवार (ता. ११)पर्यंत ५ लाख ६४ हजार २६० हेक्टरवर (६६.४७ टक्के) खरिपाची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात यंदा सोयाबीनने सरासरी क्षेत्राचा टप्पा ओलांडला. आजवर २ लाख ४७ हजार ६१५ हेक्टरवर पेरणी (१०२ टक्के) झाली आहे. कपाशीच्या क्षेत्रात घट झाल्याचे चित्र आहे. बिलोली तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी झाली आहे. याबाबत कृषी विभागाच्या सूत्रांनी माहिती दिली.

नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात गुरुवार (ता. ११)पर्यंत ५ लाख ६४ हजार २६० हेक्टरवर (६६.४७ टक्के) खरिपाची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात यंदा सोयाबीनने सरासरी क्षेत्राचा टप्पा ओलांडला. आजवर २ लाख ४७ हजार ६१५ हेक्टरवर पेरणी (१०२ टक्के) झाली आहे. कपाशीच्या क्षेत्रात घट झाल्याचे चित्र आहे. बिलोली तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी झाली आहे. याबाबत कृषी विभागाच्या सूत्रांनी माहिती दिली.

जिल्ह्यात यंदा पावसाचे आगमन उशिरा झाल्यामुळे खरिपाच्या पेरण्यांना विलंब झाला. अजूनही अनेक मंडळांमध्ये आजवर अपेक्षित पावसाच्या सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे अनेक भागांत पेरण्या झाल्या. गुरुवार (ता. ११) पर्यंत जिल्ह्यात एकूण ५ लाख ६४ हजार २६० हेक्टवर म्हणजेच सरासरीच्या ६६.४७ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. आजवर झालेल्या पेरणी क्षेत्रामध्ये सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक म्हणजे २ लाख ४७ हजार ६१५ हेक्टर आहे.

कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ४१ हजार हेक्टर असताना आजवर १ लाख ९५ हजार १०८ हेक्टरवर (५७.१६ टक्के) लागवड झाली आहे. कडधान्यामध्ये तुरीचे सर्वसाधारण क्षेत्र ७४ हजार २६२ हेक्टर असताना आजवर ५५ हजार ११८ हेक्टवर (७४.२२ टक्के), मुगाचे सर्वसाधारण क्षेत्र २६ हजार ९३६ हेक्टर असताना आजवर २१ हजार ६१६ हेक्टरवर (८०.४७ टक्के), उडदाचे सर्वसाधारण क्षेत्र ४६ हजार २८७ हेक्टर असताना, आजवर २१ हजार ५६८ हेक्टरवर (४६ .६० टक्के) पेरणी झाली. 

तृणधान्यांमध्ये भाताचे सर्वसाधारण क्षेत्र १ हजार २६८ हेक्टर असताना, आजवर १५० हेक्टर (११.८३ टक्के) पेरणी झाली. ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र ९७ हजार ६२७ हेक्टर असताना, आजवर २१ हजार ९८६ हेक्टर (२२.५२ टक्के), मक्याचे सर्वसाधारण क्षेत्र ५४१ हेक्टर असताना, आजवर ७३७ हेक्टरवर (१३६.२३ टक्के) पेरणी झाली.

इतर ताज्या घडामोडी
पुणे बाजार समिती प्रशासकपदी वर्णी...पुणे  : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे...
प्रतिकूल हवामानामुळे जुन्नर तालुक्यातील...नारायणगाव, जि. पुणे  : दोन महिन्यांपासून...
नगर जिल्ह्यातील दहा ते अकरा तालुक्यांवर...नगर  ः राज्याच्या काही भागांत जोरदार पावसाने...
पीक नुकसानीबाबत शेतकऱ्याने मांडली कृषी... कऱ्हाड, जि. सातारा ः घरात हुतं नव्हतं...
खानदेशात कापूस पिकात मर रोग, मूळकूजजळगाव ः खानदेशात जळगाव, धुळे व नंदुरबार...
...अन् नारायण राणे काँग्रेसमध्ये गेले...मुंबई  ः कोणताही अन्याय सहन करायचा नाही, या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात केळी, नारळ, सुपारी... सिंधुदुर्ग  ः कुणी तीन लाख तर कुणी दोन...
राष्ट्रपतींनी घेतला सूतकताईचा अनुभववर्धा  ः राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
पीएच.डी.साठी गुरुवारी सामाईक प्रवेश...पुणे ः  राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील...
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-... भंडारा  ः विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस...
कोयना धरणातून ६७ टीएमसी पाण्याचा विसर्गसातारा : या महिन्याच्या सुरवातीपासून मुसळधार...
मराठवाड्यात पाणीसाठ्याची स्थिती विदारकऔरंगाबाद : अर्धा पावसाळा लोटला तरीही मराठवाड्यात...
बुलडाणा जिल्ह्यात निर्माण झाली १३२५...बुलडाणाः जिल्हा प्रशासन व भारतीय जैन संघटना...
कोकणात नुकसानभरपाईचे वेगळे निकष लावा :...रत्नागिरी : ‘‘सांगली, कोल्हापूरप्रमाणेच कोकणातील...
सिंधुदुर्गात अतिवृष्टीने महावितरणचे चार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि...
शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर...जालना : सेंद्रिय शेतीमध्ये रासायनिक खतांचा...
परभणी जिल्ह्यात पाण्याअभावी फळबाग...परभणी : जिल्ह्यात गतवर्षीची दुष्काळी स्थिती आणि...
औरंगाबादेत कांदे १००० ते १६०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावच्या पश्‍चिम भागातील प्रकल्प कोरडेचजळगाव ः खानदेशात अनेक भागांत पाऊसमान चांगले असले...
प्रौढांपेक्षा अळ्यांच्या वेगळ्या...गेल्या काही वर्षांमध्ये हानीकारक ठरणाऱ्या किडी...