दोन महिन्यांपासून दिल्लीमध्ये शांततेत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला २६ जानेवारी अर्थात प्रजासत्त
ताज्या घडामोडी
सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवरील पेरणी रखडली
सांगली : जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसाने दमदार हजेरी लावली. शेतात पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी खरीप हंगामातील पिकांची काढणी रखडली आहे. त्यातच अधूनमधून पाऊस पडतोय. वाफसा झाला नाही. त्यामुळे मशागतीही थांबल्या आहेत. परिणामी जिल्ह्यात तब्बल अडीच लाख हेक्टर क्षेत्रातील रब्बीची पेरणी रखडली आहे.
जूनमध्ये पावसाचे आगमन लांबणीवर पडले. त्या वेळी जिल्ह्यात जवळपास तीन लाख ४८ हजार ४९८ हेक्टर क्षेत्रातील खरिपाची पेरणी लांबली होती. आता पावसाने रब्बी हंगाम लांबणीवर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या पावसाने पिकांत पाणी झाले आहे.

अवघ्या शेतीविश्वाची पावसाने अभूतपूर्व कोंडी केली आहे. गेल्या साडेचार पाच महिन्यांपासून जिल्ह्यात एखादा दुसरा दिवस वगळला, तर रोज पाऊस होतो आहे. ऑगस्टमधील महापूर, अतिवृष्टीने तर उभ्या पिकांचे नुकसान झाले. मॉन्सूनोत्तर पाऊस अधूनमधून हजेरी लावत आहे. याचा खरिपापाठोपाट आता रब्बी हंगामाला झटका बसणार आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने रब्बी ज्वारी, गहू, मका आदी पिकांचे पूर्व भागात मोठे क्षेत्र आहे. मात्र, याच भागात मॉन्सूनोत्तर पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात चालू रब्बी हंगामासाठी जवळपास दोन लाख ५१ हजार ४९८ हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी उपलब्ध आहे. यात सर्वाधिक क्षेत्र हे रब्बी ज्वारीचे (१ लाख ७७ हजार ६७४ हेक्टर) आणि त्या खालोखाल गहू पिकाचे (२४ हजार ७२५ हेक्टर) आहे. प्रामुख्याने जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि तासगाव तालुक्यात रब्बीचे मोठे क्षेत्र आहे. वाळवा, पलूस, मिरज पश्चिम भागासह शिराळा तालुक्याच्या नदीकाठच्या भागात तुलनेने ऊस आणि मका पिकाचे क्षेत्र आहे.
पिकांत, रानात पाणीच पाणी
जत तालुक्यात तब्बल ८० हजार ६८३ हेक्टर इतके सर्वाधिक रब्बी ज्वारीचे क्षेत्र आहे. मात्र, अद्याप पावसाचा दणका सुरू असल्याने पेरणीला अपेक्षित गती नाही. वाळवा तालुक्यात गहू पिकाचे सर्वाधिक म्हणजे तब्बल ६ हजार २६ हेक्टर क्षेत्र उपलब्ध आहे. मात्र, तालुक्यात सर्वत्र पाणीच पाणी असल्याने पेरणी अजून किमान महिनाभर तरी होईल, असे चिन्ह नाही. नोव्हेंबर उजाडला आहे. मात्र, अद्याप पेरणीची सुरवात झाली नसल्याचे चित्र आहे.
- 1 of 1030
- ››