परभणी जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर पेरणी

परभणी जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर पेरणी
परभणी जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर पेरणी

परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात मंगळवारपर्यंत (ता. १६) ४ लाख ५५ हजार ८८० हेक्टरवर (८७.३६ टक्के) पेरणी झाली. सोयाबीनची सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा जास्त म्हणजे १ लाख ९२ हजार ६४ हेक्टरवर (२१६.५० टक्के) पेरणी झाली. याशिवाय कपाशी, तूर, उडीद, ज्वारी, बाजरीचे क्षेत्र कमी झाले आहे. 

अजूनही अल्प पाऊस असलेल्या मंडळातील पेरण्या रखडलेल्याच आहेत. पूर्णा तालुक्यात सर्वात कमी म्हणजे ४३.५९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पावसाने दडी मारल्यामुळे नुकत्याच उगवू लागलेल्या पिकांना पाण्याचा ताण जाणवत आहे. अनेक मंडळांवर दुबार पेरणीचे सावट आहे.

जिल्ह्यात यंदा ५ लाख २१ हजार ८७० हेक्टवर खरिपाची पेरणी नियोजित आहे. कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ९ हजार ४८० हेक्टर आहे. त्यापैकी १ लाख ८६ हजार २१९ हेक्टरवर पेरणी झाली. तुरीच्या सर्वसाधारण ६१ हजार २३० हेक्टरपैकी ४० हजार ९९१ हेक्टरवर पेरणी झाली. मुगाची सर्वसाधारण ५३ हजार १५० हेक्टरपैकी २३ हजार ५९८ हेक्टरवर, उडदाची १४ हजार १४० हेक्टरपैकी ६ हजार ४१७ हेक्टरवर, ज्वारीची ६९ हजार ९६० हेक्टरपैकी ५ हजार १२० हेक्टरवर, बाजरीची ६ हजार ६६० हेक्टरपैकी ५४७ हेक्टरवर पेरणी झाली. 

सोयाबीन पेरणीस पंसती सर्वच तालुक्यातील शेतकऱ्यांनी गतवर्षी प्रमाणेच यंदाही सोयाबीनला अधिक पसंती दिली. जिल्ह्यात सोयाबीनचे सर्वधारण क्षेत्र ८८ हजार ६८० हेक्टर आहे. त्यापैकी मंगळवार (ता.१६) पर्यंत १ लाख ९२ हजार ६४ हेक्टरवर पेरणी झाली. जिंतूर आणि गंगाखेड तालुक्यात सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा जास्त पेरणी झाली. पूर्णा तालुक्यात सर्वांत कमी म्हणजे ४३.५९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली.

तालुकानिहाय पेरणी (हेक्टर)

तालुका  सर्वसाधारण क्षेत्र  पेरणी क्षेत्र टक्केवारी
परभणी १०६३३०  ८०१४६ ७५.३७
जिंतूर  ७६१४०  ८७७९९ ११५.७१
सेलू ५७४३०   ४९४५३ ८६.११
मानवत ४१०००  ४०७७७ ९९.३५
पाथरी  ४६७१० ४४३२९ ९४.९०
सोनपेठ ४००८० ३५०२४  ८७.३९
गंगाखेड ४२६२१  ५००५७  ११७.४५
पालम  ४९७७०  ३७५४२ ७५.४३
पूर्णा ६३३८० ३०७९७  ४३.५९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com