सातारा जिल्ह्यात ६३.५९ टक्के पेरणी

सातारा ः जिल्ह्यात पावसाने ओढ दिली असली तरी पेरणीची कामे सुरूच आहेत. जिल्ह्यात बुधवार(ता. १)अखेर ६३.५९ टक्के पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत. पाटण तालुक्यात सर्वाधिक ९३.२१ टक्के पेरणी झाली आहे. सुरुवातीस झालेल्या पिकांच्या वाढीसाठी पावसाची गरज निर्माण असल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.
Sowing 63.59 percent in Satara district
Sowing 63.59 percent in Satara district

सातारा ः जिल्ह्यात पावसाने ओढ दिली असली तरी पेरणीची कामे सुरूच आहेत. जिल्ह्यात बुधवार(ता. १)अखेर ६३.५९ टक्के पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत. पाटण तालुक्यात सर्वाधिक ९३.२१ टक्के पेरणी झाली आहे. सुरुवातीस झालेल्या पिकांच्या वाढीसाठी पावसाची गरज निर्माण असल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.

कृषी विभागाने खरीप हंगामात जिल्ह्यात तीन लाख १६ हजार ७०१ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. यापैकी बुधवारअखेर दोन लाख एक हजार ३८९ हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच ६३.५९ टक्के पेरणीची कामे झाली आहेत. निसर्ग वादळामुळे झालेल्या पावसामुळे जूनच्या सुरुवातीपासून पेरणीची कामे सुरू झाली होती.

जिल्ह्यात सर्वाधिक पाटण तालुक्यात पेरणी झाली आहे. या तालुक्याचे ५९ हजार ३८३ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी ५५ हजार ३५१ क्षेत्रावर म्हणजेच ९३.२१ टक्के पेरणी झाली आहे. पिकांत सर्वाधिक सोयाबीनची लागवड झाली आहे. सोयाबीनचे ६३ हजार ७५४ सर्वसाधारण क्षेत्रापैकी ६० हजार ७३६ हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच ९५.२७ टक्के लागवड झाली आहे. बाजरीचे ६४ हजार सर्वसाधारण क्षैत्रापैकी ३० हजार ७३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

खरीप ज्वारीचे २४ हजार २०३ हेक्टर क्षैत्रापैकी १५ हजार ६०५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. भात पिकांचे ४९ हजार ८९ हेक्टर क्षैत्रापैकी २५ हजार ४५ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. दमदार पाऊस नसल्यामुळे भाताच्या नर्सरी तयार असून भात लागणीची कामे ठप्प झाली आहेत.

तालुकानिहाय पेरणी हेक्टरमध्ये सातारा- २४,०९२, जावली- १०,२२९, पाटण- ५५,३५१, कराड-२९,३४९, कोरेगाव-२१,३८१, खटाव-२०,१९३, माण-१०,४९१,फलटण-१२,४८४, खंडाळा-७,६४५,वाई-९,४०४, महाबळेश्वर-३७४.

पावसाची गरज जून महिन्याच्या सुरुवातीपासून पेरण्या सुरू झाल्याने सर्वच तालुक्यात पेरण्या मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत. दुष्काळ माण, फलटण तालुक्यात काही ठिकाणी झालेला पाऊस फायदेशीर झाला आहे. मात्र, पाऊस गायब झाल्याने पिकांना पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. पिकांच्या वाढीसाठी पाण्याची अत्यंत गरज भासू लागल्याने काही शेतकऱ्यांकडून पाणी दिले जात आहे. पावसाने लवकर हजेरी नाही लावली तर पिके सुकण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com