नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्यांविरोधात मागील ५६ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या
बातम्या
परभणी जिल्ह्यात ज्वारीची ८७ हजार हेक्टरवर पेरणी
परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात गुरुवार (ता. ५)पर्यंत १ लाख २९ हजार ८९९ हेक्टरवर (४६.८३ टक्के) पेरणी झाली आहे. मानवत तालुक्यातील पेरणी क्षेत्राने सर्वसाधारण क्षेत्राचा टप्पा ओलांडला आहे. पालम तालुक्यात अद्यापही २० टक्केच्या आतच पेरणी झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात ज्वारी १ लाख ५९ हजार ७८ हेक्टर, गहू ३० हजार ४७६ हेक्टर, हरभरा ५३ हजार २६४ हेक्टर, जवस १ हजार १९९ हेक्टर, सूर्यफूल १ हजार ९३ हेक्टर अशी एकूण २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे.

ज्वारीचा पेरणी कालावधी संपला आहे. सिंचनासाठी पाणी असल्यामुळे शेतकरी हरभरा तसेच गव्हाला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे यंदा ज्वारीचे पेरणी क्षेत्र कमी रहाण्याची शक्यता आहे. गुरुवारपर्यंत ज्वारीची ८७ हजार ६९९ हेक्टरवर, गव्हाची ५ हजार ८६९ हेक्टरवर, हरभऱ्याची ३४ हजार ९५ हेक्टरवर, करडईची १ हजार ५२८ हेक्टरवर, जवसाची १२ हेक्टरवर, रब्बी मक्याची १३१ हेक्टरवर पेरणी झाली. आजवर १ लाख २९ हजार ८९९ हेक्टर म्हणजेच ४६.८३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
मानवत तालुक्यातील सरासरी पेरणी क्षेत्र ९ हजार ७१६ हेक्टर आहे. आजवर ११ हजार २३२ हेक्टरवर (११५.६० टक्के) पेरणी झाली. जिंतूर, सेलू, गंगाखेड तालुक्यात ६५ टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सोनपेठ, गंगाखेड तालुक्यातील पेरणी क्षेत्र ४५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. परभणी, पाथरी, सोनपेठ, पालम, पूर्णा तालुक्यातील पेरणी क्षेत्र ३० टक्क्यांपेक्षा कमी आहे.
पीकनिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)
पीक | सर्वसाधारण | पेरणी क्षेत्र | टक्केवारी |
ज्वारी | १५९०७८ | ८७६९९ | ५५.१५ |
गहू | ३०४७६ | ५८६९ | १९.२४ |
हरभरा | ५३०६४ | ३४०९५ | ६४.२५ |
करडई | २५२०९ | १५२८ | ६.०० |
जवस | ११९९ | १२ | १.०० |
- 1 of 1498
- ››