agriculture news in Marathi sowing after good rain Maharashtra | Agrowon

पेरणीची घाई नको : कृषी आयुक्तालय

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 15 जून 2021

राज्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पूर्वमशागतीची कामे करावीत; मात्र ८० ते १०० मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असा सल्ला कृषी आयुक्तालयाने दिला आहे.

पुणेः राज्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पूर्वमशागतीची कामे करावीत; मात्र ८० ते १०० मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असा सल्ला कृषी आयुक्तालयाने दिला आहे. 

गेल्या आठ दिवसांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. परंतु, पावसाचे प्रमाण सर्वत्र सारखे नाही. कोकण सोडून इतर ठिकाणी तुरळक पाऊस होत आहे. त्यामुळे सोयाबीन, तूर ,भुईमूग, मका पिकासाठी पेरणीसाठी आवश्यक असलेली पूर्वतयारीची कामे करावीत, असे आयुक्तालयाचे म्हणणे आहे. 

विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी सध्या भात रोपवाटिकांची पूर्वतयारी चालू ठेवावी. कापूस व सोयाबीन उत्पादकांनी जमिनीच्या प्रकारानुसार पूर्व मशागतीची कामे करावीत. सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, मका पिकासाठी नांगरणी व वखराच्या पाळ्या देऊन शेतजमीन तयार करावी, असा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. 

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, राज्यात १४ जूनपर्यंत सरासरी ९६ टक्के पाऊस होत असतो. मात्र, यंदा तो १२० टक्के झालेला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीपर्यंत ११७ टक्के पाऊस झाला होता. कोकण, औरंगाबाद, अमरावती विभागात १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. अर्थात, पुणे विभागात ७५ टक्के तर नाशिक विभागात ४६ टक्के तर नागपूर विभागात आतापर्यंत झालेला पाऊस ८६ टक्के आहे. 

शेतकऱ्यांनी कोल्हापूर विभागात १२ हजार हेक्टरवर खरीप पेरा केलेला आहे. यात धानाचा ९ हजार हेक्टरपेक्षा जास्त धूळपेरा केला आहे. दोन हजार हेक्टरवर सोयाबीनचाही पेरा झालेला आहे. मका, तूर, मूग, उडीद, ज्वारी अशा पिकांच्या ५०० हेक्टरपेक्षा पेरा गेल्या आठवड्यात झालेला होता. 

शेतकऱ्यांनी पुरेसा म्हणजेच किमान ८० ते १०० मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असा सल्लाही विविध जिल्ह्यांमधील कृषी कार्यालयांकडून दिला जातो आहे. कारण, अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. पुरेसा पाऊस झाल्यास खंड पडला तरी पीक तग धरू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. 

उन्हाळी लागवड दुप्पट 
राज्यात यंदा उन्हाळी हंगामातील पेरा २०० टक्क्यांच्या पुढे गेला आहे. उन्हाळी पिकांचा पेरा सरासरी पावणे दोन लाखाच्या आसपास होत असतो. यंदा हाच पेरा गेल्या आठवडयापर्यंत चार लाख हेक्टरच्या पुढे गेला होता. यात उन्हाळी भात, भुईमूग, सूर्यफूल, ज्वारी,बाजरी, मका पिकाचा समावेश होता. सध्या या पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आहे. 
 


इतर अॅग्रो विशेष
मानवनिर्मित आपत्ती!राज्यात बेफामपणे कोसळणाऱ्या पावसाने सगळीकडे एकच...
दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसानपुणे : राज्यातील बहुतांश भागांत पावसाने उघडीप...
मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा...शिरपूर, जि. धुळे : जिल्ह्यात अनेक भागांत मका...
कोकणात पावसाची शक्यता पुणे : बंगालचा उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
कोल्हापुरात नद्यांचे पाणी ओसरण्याऐवजी...कोल्हापूर : सलग दुसऱ्या दिवशी पावसाने विश्रांती...
शेतकरी संसदेत आज ‘महिला राज’ नवी दिल्ली ः मोदी सरकारचे तीन कृषी कायदे रद्द...
आंदोलनादरम्यान एकही शेतकरी मृत्यूची...नवी दिल्ली ः केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात...
थेट कृषिमंत्र्यांचीच केली दिशाभूल; ‘...अमरावती : विमा कंपनीच्या प्रतिनिधीने खोटी माहिती...
सर्वंकष आढावा घेऊन नुकसान भरपाई जाहीर...रत्नागिरी : ‘‘तुम्हाला पायावर उभे करण्यासाठी...
बहुपीक पद्धतीतून साधले नफ्याचे सूत्रकोल्हापूर जिल्ह्यातील शेंडूर (ता. कागल) येथील...
पावसाची उघडीप; पूरस्थिती कायम पुणे : कोकण, सातारा, कोल्हापूर, सांगली, पुण्यासह...
सांगलीत चौदा हजार जनावरांचे स्थलांतरसांगली : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूर पट्यातील...
कोसळलेला प्रसंग मोठा; तुमचं पुनर्वसन...मुंबई ः तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे....
पावसाचा जोर पंधरा दिवस कमी राहण्याची...पुणे : मुसळधार पावसाने रत्नागिरी, रायगडसह,...
नऊ जिल्हे अतिवृष्टिबाधित मुंबई ः कोकण आणि पश्‍चिम महाराष्‍ट्रातील ९ जिल्हे...
वाशीम जिल्ह्यात ६९९ कोटींचे पीककर्ज वाटपवाशीम : जिल्ह्यात या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना...
कोल्हापुरात पुराची भीती कायम कोल्हापूर : पावसाने शनिवारी (ता.२४) दुपारपर्यंत...
उपलोकायुक्त, सचिव, आयुक्तांनी सांगूनही...पुणे ः जलयुक्त शिवार अभियानावर खर्च दाखवलेल्या...
शेतीला मिळाली दुग्ध प्रक्रियेची जोडघोटावडे (ता. मुळशी, जि. पुणे) प्रियांका जालिंदर...
तुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५...कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी)...