अकोला जिल्ह्यातील पेरण्या रखडलेल्याच

अकोला ः जून महिना संपुर्ण उलटला, तरी अनियमित स्वरुपाच्या पावसामुळे अकोल्यातील जवळपास ३९ टक्के क्षेत्रावर पेरण्या बाकी आहे.
Sowing in Akola district is stalled
Sowing in Akola district is stalled

अकोला  ः जून महिना संपुर्ण उलटला, तरी अनियमित स्वरुपाच्या पावसामुळे अकोल्यातील जवळपास ३९ टक्के क्षेत्रावर पेरण्या बाकी आहे. आजवर झालेल्या पेरणीत सोयाबीन व कापसाची लागवड सर्वाधिक झाली. तरी, संपूर्ण क्षेत्र मात्र लागवडी खाली यायचे आहे. चार लाख ८४ हजार लक्षांकित क्षेत्रापैकी दोन लाख ९८ हजार ३१६ हेक्टरवर आजवर पेरणी झाली आहे. 

जून महिन्यात तीन ते चारवेळा पाऊस सलग झाला. त्यानंतर सातत्याने खंड पडत आहेत. याचा फटका पेरणीला बसला आहे. प्रामुख्याने बाळापूर, अकोला, तेल्हारा, मूर्तिजापूर या तालुक्यांची पेरणी पिछाडीवर आहे. यातच या तालुक्यांमध्ये सोयाबीन बियाण्यांची उगवण न झाल्याने दुबार पेरणीचे संकट अनेक शेतकऱ्यांना झेलावे लागत आहे. अकोला तालुक्यात बोरगावमंजू, तसेच खारपाण पट्ट्यात सोयाबीन मोडणी करून शेतकरी दुबार पेरणीसाठी मुबलक पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. 

जिल्ह्यात या हंगामात सोयाबीनचे एक लाख ६० हजार हेक्टरवर लागवडीचे ध्येय आहे. त्यांपैकी १ लाख ४६ हजार ४९४ हेक्टरवर पेरणी झाली. त्यानंतर कपाशीचेही एक लाख ६० हजार हेक्टरचे नियोजन करण्यात आले. यांपैकी ८० हजार ९२६ हेक्टरवर लागवड पूर्ण झाली आहे. पाऊस लांबत असल्याने कदाचित आता कपाशीच्या उर्वरित क्षेत्रापैकी काही क्षेत्र हे इतर पिकांच्या लागवडी खाली येऊ शकते. अद्यापही जिल्हयात मुबलक पावसाची आवश्यकता आहे.  जिल्ह्यातील पिकनिहाय लागवड (हेक्टर) (कंसात टक्के) 

मूग .१४४६५ (६४) 
तूर ४०००३ (७१)
उडीद ११७६८ (७१)
सोयाबीन १४६४९४ (६७)
कापूस ८०९२६ (५२) 
एकूण २९८३१६ (६१.७३) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com