नवापूर तालुक्यात भातासह कापूस, ज्वारीची पेरणी पूर्ण

नवापूर, जि.नंदुरबार ः नवापूर तालुक्यात भातासह कापूस, ज्वारी आदी पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. परंतु, चांगला पाऊस नसल्याने भात, कापूस पीक संकटात सापडले आहे.
Sowing of cotton and sorghum with paddy completed in Navapur taluka
Sowing of cotton and sorghum with paddy completed in Navapur taluka

नवापूर, जि.नंदुरबार  ः नवापूर तालुक्यात भातासह कापूस, ज्वारी आदी पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. परंतु, चांगला पाऊस नसल्याने भात, कापूस पीक संकटात सापडले आहे. 

भाताचे क्षेत्र यंदा वाढले आहे. कापसाची लागवडही बऱ्यापैकी झाली आहे. साठ हजार हेक्टर एवढे पेरणीचे उद्दिष्ट तालुक्यात पूर्ण झाले आहे. भाताची लागवड सुमारे एक हजार ७०० हेक्टरवर झाली आहे. कापसाची नऊ हजार ८०० हेक्टरवर लागवड झाली आहे. तर, सोयाबीनची पेरणी सुमारे आठ हजार ३६८ हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. पेरणी वेळेत झाली. परंतु, पाऊस असमान आहे. खतांची टंचाई तालुक्यात सुरवातीपासून आहे. 

भात पिकाची लागवड वेळेत झाली. परंतु, पेरणीनंतर जोरदार पाऊस नाही. फक्त पीक जगण्यापुरता पाऊस झाला आहे. त्याची वाढ हवी तशी नाही. जून महिन्यात सरासरीच्या ५० टक्केही पाऊस झाला नाही. तर, जुलै महिन्यातही पाऊस कमीच आहे. रोज ढग दाटून येतात. परंतु, सरी बरसत नाहीत. रोज ऊन तापत आहे. पाऊस नसल्याने तालुक्यातील अनेक सिंचन प्रकल्पही रिकामेच आहेत. 

पिके तगण्यासाठी पावसाची गरज

खांडबारा, विसरवाडी भागात भात पीक अधिक असते. या भागात दरवर्षी चांगला पाऊस येतो. परंतु, यंदा पाऊसमान कमी आहे. पाऊस आलाच नाही, तर कापूस, ज्वारी ही पिके मोडावी लागतील. मग, दुबार पेरणी करताना कुठले पीक पेरायचे, हा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर आहे. पावसाची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com