सिन्नर तालुक्यात ‘बीबीएफ’ तंत्रज्ञानाद्वारे पेरणी प्रात्यक्षिक

नाशिक : कृषी संजीवनी सप्ताहांतर्गत सिन्नर तालुक्यातील मोह येथे कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने बीबीएफ तंत्रज्ञानाद्वारे सोयाबीन ‘फुले कल्याणी’ या जातीचे ब्रीडर बियाणे पेरणी प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना करून दाखविण्यात आले.
Sowing demonstration using ‘BBF’ technology in Sinnar taluka
Sowing demonstration using ‘BBF’ technology in Sinnar taluka

नाशिक : कृषी संजीवनी सप्ताहांतर्गत सिन्नर तालुक्यातील मोह येथे कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्र नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने बीबीएफ तंत्रज्ञानाद्वारे सोयाबीन ‘फुले कल्याणी’ या जातीचे ब्रीडर बियाणे पेरणी प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना करून दाखविण्यात आले.

२००९ पासून या गटामध्ये १५ शेतकरी कुटुंबे जोडलेली आहेत. पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन आधुनिक पद्धतीने बिजोत्पादन कार्यक्रम सुरू आहे. या ठिकाणी नवनवीन वाणांची ओळख करून दिली आहे. यासाठी चालू वर्षी कृषी विज्ञान केंद्र नाशिक यांच्याकडून ४५० किलो बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याची १५ एकर क्षेत्रावर बीबीएफ पद्धतीने पेरणी करण्यात आली आहे.

येथील संजीवनी शेतकरी गटाच्या माध्यमातून बिजोत्पादन घेण्यासाठी शेतकरी अरुण भिसे यांच्या शेतावर हे आयोजन करण्यात आले होते. या वेळी निफाड उपविभागीय कृषी अधिकारी गोकूळ वाघ, तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे, कृषी विज्ञान केंद्र नाशिकच्या कृषी अभियांत्रिकी शाखेचे विषय विशेषज्ञ डॉ. राजाराम पाटील, कृषी विद्या शाखेचे विषय विशेषज्ञ डॉ. प्रकाश कदम यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

या वेळी मंडळ कृषी अधिकारी महेश वेठेकर, मोहचे सरपंच सोमनाथ बोडके, संजीवनी शेतकरी बचत गटाचे अध्यक्ष सुनील भिसे, रामदास भिसे, किरण बोराडे, भारत बोडके, पांडुरंग भिसे, भगवान झाडे, संदीप भिसे, गोरख भिसे हे उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com