नगर जिल्ह्यात ज्वारीची पावणे तीन लाख हेक्टरवर पेरणी

नगर जिल्ह्यात ज्वारीची पावणे तीन लाख हेक्टरवर पेरणी
नगर जिल्ह्यात ज्वारीची पावणे तीन लाख हेक्टरवर पेरणी

नगर : जिल्ह्यामधील बहुतांश भागात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. आता रब्बीच्या पेरण्यांना वेग येऊ लागला आहे. आतापर्यंत रब्बी हंगामातील सरासरीच्या ४१ टक्के म्हणजे २ लाख ७३ हजार ४८८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. पेरणी झालेले सर्व क्षेत्र ज्वारीचेच आहे. यंदा रब्बीत सरासरीपेक्षा जास्ती ज्वारीची पेरणी होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. 

जिल्ह्यामध्ये रब्बीत ६ लाख ६७ हजार २६१ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्यात ज्वारीचे ४ लाख ६९ हजार ७८५ हेक्टर क्षेत्र आहे. गव्हाचे ४९ हजार ७८५, मक्याचे २७ हजार २४५ हेक्टर, हरभऱ्याचे १ लाख १८ हजार १०३ हेक्टर, करडईचे ८४४ हेक्टर, तिळाचे १५९ हेक्टर, जवसाचे १६४ हेक्टर, सूर्यफुलाचे ८७ हेक्टर क्षेत्र आहे.  यंदा रब्बीच्या पेरणीला वेग आला आहे. आतापर्यंत ५८ टक्क्यांवर म्हणजे २ लाख ७३ हजार ४२६ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. करडईची २ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

गेल्यावर्षी परतीचा पाऊस झाला नव्हता. त्याचा परिणाम रब्बीमधील ज्वारीच्या पेरणीवर झाला होता. शिवाय जेथे पेरणी झाली, तेही पीक पावसाअभावी वाया गेले होते. यंदा मात्र परतीचा पाऊस होत असल्याने ज्वारीसह अन्य पिकांचीही सरासरीच्या पुढे पेरणी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. 

गव्हाची पेरणी सुरू

जिल्ह्यात रब्बीत दरवर्षी साधारण ५० हजार हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी होत असते. गेल्या वर्षी मात्र पाऊस नसल्याचा गव्हाच्या व हरभऱ्याच्या पेरणीवर परिणाम झाला होता. यंदा मात्र परतीच्या पावसाने चांगली हजेरी लावत असल्याने गव्हाची व हरभऱ्याची सरासरी एवढी तरी पेरणी होण्याच अंदाज शेतकरी व्यक्त करत आहेत. गव्हाची आतापर्यंत ६० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. हरभऱ्याच्या पेरणीला अजून सुरवात झाली नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com