Agriculture news in marathi, In sowing district sowing of sorghum on two lakh and 75 thousand hectares | Agrowon

नगर जिल्ह्यात ज्वारीची पावणे तीन लाख हेक्टरवर पेरणी

टीम अॅग्रोवन
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

नगर : जिल्ह्यामधील बहुतांश भागात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. आता रब्बीच्या पेरण्यांना वेग येऊ लागला आहे. आतापर्यंत रब्बी हंगामातील सरासरीच्या ४१ टक्के म्हणजे २ लाख ७३ हजार ४८८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. पेरणी झालेले सर्व क्षेत्र ज्वारीचेच आहे. यंदा रब्बीत सरासरीपेक्षा जास्ती ज्वारीची पेरणी होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. 

नगर : जिल्ह्यामधील बहुतांश भागात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. आता रब्बीच्या पेरण्यांना वेग येऊ लागला आहे. आतापर्यंत रब्बी हंगामातील सरासरीच्या ४१ टक्के म्हणजे २ लाख ७३ हजार ४८८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. पेरणी झालेले सर्व क्षेत्र ज्वारीचेच आहे. यंदा रब्बीत सरासरीपेक्षा जास्ती ज्वारीची पेरणी होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. 

जिल्ह्यामध्ये रब्बीत ६ लाख ६७ हजार २६१ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्यात ज्वारीचे ४ लाख ६९ हजार ७८५ हेक्टर क्षेत्र आहे. गव्हाचे ४९ हजार ७८५, मक्याचे २७ हजार २४५ हेक्टर, हरभऱ्याचे १ लाख १८ हजार १०३ हेक्टर, करडईचे ८४४ हेक्टर, तिळाचे १५९ हेक्टर, जवसाचे १६४ हेक्टर, सूर्यफुलाचे ८७ हेक्टर क्षेत्र आहे. 
यंदा रब्बीच्या पेरणीला वेग आला आहे. आतापर्यंत ५८ टक्क्यांवर म्हणजे २ लाख ७३ हजार ४२६ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. करडईची २ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

गेल्यावर्षी परतीचा पाऊस झाला नव्हता. त्याचा परिणाम रब्बीमधील ज्वारीच्या पेरणीवर झाला होता. शिवाय जेथे पेरणी झाली, तेही पीक पावसाअभावी वाया गेले होते. यंदा मात्र परतीचा पाऊस होत असल्याने ज्वारीसह अन्य पिकांचीही सरासरीच्या पुढे पेरणी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. 

गव्हाची पेरणी सुरू

जिल्ह्यात रब्बीत दरवर्षी साधारण ५० हजार हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी होत असते. गेल्या वर्षी मात्र पाऊस नसल्याचा गव्हाच्या व हरभऱ्याच्या पेरणीवर परिणाम झाला होता. यंदा मात्र परतीच्या पावसाने चांगली हजेरी लावत असल्याने गव्हाची व हरभऱ्याची सरासरी एवढी तरी पेरणी होण्याच अंदाज शेतकरी व्यक्त करत आहेत. गव्हाची आतापर्यंत ६० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. हरभऱ्याच्या पेरणीला अजून सुरवात झाली नाही.


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...