नगर : खरिपात पाच लाख हेक्टरवर पेरणीचा अंदाज

खरिपात पाच लाख हेक्टरवर पेरणीचा अंदाज
खरिपात पाच लाख हेक्टरवर पेरणीचा अंदाज

नगर : यंदाच्या खरिपात साधारण ५ लाख ३४ हजार २७० हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यानुसार सार्वजनिक (महामंडळ) व खासगी कंपन्यांकडून मिळून ७० हजार १२९ क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे. त्यात महाबीज सुमारे ३५ हजार ७६६ क्विंटल बियाणेपुरवठा करणार असल्याची माहिती कृषी विभागातून देण्यात आली. 

जिल्ह्यामध्ये गतवर्षीच्या पावसाळ्यात पुरेसा पाऊस झाला नसल्याने खरिपातील पिके वाया गेली. रब्बीत पेरणीच झाली नाही. त्यामुळे शेतीचे दोन्ही हंगामात मोठे नुकसान झाले. यंदा चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. खरिपाची सरासरी ४ लाख ७८ हजार ६३८ हेक्टर क्षेत्र आहे. ५ लाख ३४ हजार २७० हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. त्यानुसार कृषी विभागाने बियाणे मागणी केली आहे. 

सरासरी हेक्टर क्षेत्रानुसार बियाणे मागितले जात असले, तरी खरिपात २०१६ साली ३१ हजार १३८ क्विंटल, २०१७ साली ५५ हजार ०८१ क्विंटल व २०१८ साली ४४ हजार १८० क्विंटल बियाणांची विक्री झाली होती. यंदा कृषी विभागाने ७० हजार १२९ क्विंटल बियाणे मागणी केली. ४० हजार ३३४ क्विंटल बियाणे महाबीज व राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून, तर २९ हजार ७९५ क्विंटल बियाणे खासगी कंपन्याकडून पुरवठा केले जाणार आहे.

पीक मागणी केलेले बियाणे (क्विंटल) 
भात ९६०
ज्वारी १०
बाजरी ६००
मका   १००
तूर  ३५८
मूग ७३३
उडीद ४१७७
तीळ ४२०
तीळ
सूर्यफूल ५१
सोयाबीन  २८०००
कापूस ३२२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com