Agriculture news in Marathi sowing of fodder crops in Pune region | Agrowon

पुणे विभागात चारा पिकांच्या पेरणीवर भर

टीम अॅग्रोवन
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

पुणे ः उन्हाळ्यात जनावरांना चाऱ्याची अडचण येऊ नये, म्हणून रब्बी हंगामात चारापिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. त्यामुळे चारापिकांच्या क्षेत्रात चांगलीच वाढ झाली आहे. पुणे विभागात आत्तापर्यंत एक लाख १२ हजार १२० हेक्टरवर चारापिके घेतली आहेत. येत्या काळात जनांवरासाठी मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध होणार असून, उन्हाळ्यातील भासणारी चाराटंचाई काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.

पुणे ः उन्हाळ्यात जनावरांना चाऱ्याची अडचण येऊ नये, म्हणून रब्बी हंगामात चारापिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. त्यामुळे चारापिकांच्या क्षेत्रात चांगलीच वाढ झाली आहे. पुणे विभागात आत्तापर्यंत एक लाख १२ हजार १२० हेक्टरवर चारापिके घेतली आहेत. येत्या काळात जनांवरासाठी मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध होणार असून, उन्हाळ्यातील भासणारी चाराटंचाई काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.

शेतीला जोडधंदा म्हणून बहुतांशी शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात. त्यामुळे अनेक शेतकरी गाई, म्हशी, बैल अशा जनावरांचे संगोपन करतात. जनावरांसाठी चारा वेळेत उपलब्ध व्हावा म्हणून अनेक शेतकरी हिरवा चाऱ्यासाठी मका, कडवळ, बाजरीची पेरणी तर नेपिअर ग्रास, लुसर्नग्रास अशा विविध चारा पिकांची लागवड करतात. त्यामुळे जनावरांना वर्षभर पुरेल एवढा चारा टप्प्याटप्प्याने उपलब्ध होतो. 

याशिवाय साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाल्यानंतर अनेक शेतकरी उसाच्या वाड्याचा वापर चारा म्हणून करतात. याशिवाय सुका चारा म्हणून वाळलेले वाडे, मका, कडवळ अशा विविध पिकांचे नियोजन करून वापर करतात.

पुणे विभागासह राज्यात गायी, म्हशी, शेळ्या, कालवडी, बैल यांची जवळपास तीन ते साडेतीन कोटी जनावरांची संख्या आहे. मागील दोन ते तीन वर्षांपूर्वी चारा टंचाईमुळे जनावरासाठी चारा छावण्या सुरू करण्याची वेळ शासनावर आली होती. त्यामुळे पुन्हा तशीच स्थिती उद्भवू नये, म्हणून शेतकरी पुढाकार घेत चारा पिकांचे नियोजन करत आहे. त्यासाठी कृषी विभाग आणि जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाकडून शेतकऱ्यांना मका पिकांसारख्या चारा पिकांचे बियाणे उपलब्ध करून देण्यात येते. त्याचा फायदा बहुतांशी शेतकरी घेत चारा पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चारा पिकांचे उत्पादन मिळते. 

यंदा विभागातील नगर जिल्ह्यात सर्वाधिक ५० हजार ५६२ हेक्टरवर चारा पिकांची पेरणी केली आहे. पुणे जिल्ह्यात ३८ हजार ८६५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात २२ हजार ६९३ हेक्टरवर पेरणी झाली आहे.


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबाद बाजार समितीत मिरचीची १३०...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
'राज्यातील पोलीस पाटील, ग्रामसेवकांनाही...बुलडाणा : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
उद्धव ठाकरे परिषदेवर जाणार विधानसभेतून...मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव...
मुद्रित माध्यमेच सर्वाधिक विश्‍वसनीय :...नागपूर: कोरोनाविषयी विविध माध्यमे आणि सोशल...
परभणीत पहिल्या दिवशी १७५ किलो...परभणी : कृषी विभागाच्या महाराष्ट्र...
‘कोरोना’च्या सावटातही पैसे काढण्यासाठी...अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटात मदत...
पणन हेल्पलाईनला फोन केला.. अन्‌ ढोबळी...पुणे : पणन मंडळाच्या आंतरराज्य शेतमाल वाहतूक...
बीसीजी लस घेतलेल्यांना कोरोनाचा धोका...पुणे : क्षयरोगाचा (ट्यूबरक्यूलोसिस-टीबी) प्रतिबंध...
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या...मुंबई: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
पुणे विभागात यंदा कमी पाणीटंचाईपुणे : मॉन्सून कालावधीतील दमदार पाऊस,...
कृषिरत्न फाउंडेशनची ‘आधारतीर्थ’तील...नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सध्या...
पुणे विभागात धान्याचा साडेसतरा हजार...पुणे : ‘‘पुणे विभागाात दोन एप्रिल रोजी...
लॉकडाऊनमुळे कृषी यांत्रिकीकरणाचे ९...पुणे: राज्याच्या कृषी यांत्रिकीकरण मोहिमेला...
सांगलीतील नागवेलीच्या पानांना मागणी...सांगली : कोरोना विषाणूमुळे परराज्यातून...
कराडमधील ग्राहकांच्या घरी १४० पेट्या...रत्नागिरी : ऐन हंगामात ‘कोरोना’च्या...
पीकविम्याची रक्कम कर्जखात्यांत जमा करू...अकोला : ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर बँकांनी खरीप...
मोफत धान्य देण्यासंदर्भात केंद्राचे...मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सध्या...
‘जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांत ‘सोशल...नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्यातील...
आठवड्याचा अंदाज : ढगाळ हवामानासह...महाराष्ट्रावर हवेचा दाब १०१० हेप्टापास्कल इतके...
आरोग्यदायी लसूणआपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक म्हणजेच लसूण...