agriculture news in marathi, Sowing increased by 10 percent in Khandesh | Agrowon

खानदेशातील पेरणी १० टक्क्यांनी वाढली
टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 जुलै 2018

जळगाव : मागील वर्षाच्या तुलनेत पावसाची स्थिती बरी असल्याने खानदेशात नापेर क्षेत्र कमी झाले अाहे. मागील हंगामात जवळपास १८ टक्के क्षेत्र नापेर राहिले होते. त्यात कडधान्य व तृणधान्याला मोठा फटका बसला होता. यंदा फक्त आठ टक्के क्षेत्रावर कोणत्याही पिकाची पेरणी होणार नाही, अशी स्थिती आहे.

जळगाव : मागील वर्षाच्या तुलनेत पावसाची स्थिती बरी असल्याने खानदेशात नापेर क्षेत्र कमी झाले अाहे. मागील हंगामात जवळपास १८ टक्के क्षेत्र नापेर राहिले होते. त्यात कडधान्य व तृणधान्याला मोठा फटका बसला होता. यंदा फक्त आठ टक्के क्षेत्रावर कोणत्याही पिकाची पेरणी होणार नाही, अशी स्थिती आहे.

जळगाव जिल्ह्यात सात लाख ६५ हजार हेक्‍टर, धुळ्यात चार लाख २० हजार आणि नंदुरबारात दोन लाख ७३ हजार हेक्‍टरवर पेरणीचा लक्ष्यांक खरिपासंबंधी ठेवण्यात आला. जळगाव जिल्ह्यात जवळपास ९०, धुळ्यात शिरपूर, शिंदखेडा भागात ९२, तर नंदुरबारात ८८ टक्‍क्‍यांवर पेरणी झाली आहे. मागील हंगामात जुलैअखेरपर्यंत खानदेशात ७५ टक्केच क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यातही तिबार पेरणी करावी लागली होती. कापूस, तृणधान्ये व कडधान्य पिकांना मोठा फटका बसला होता.

धुळे तालुक्‍यातील काही भागात आणि जळगाव जिल्ह्यातील चोपडा, जळगावात सोयाबीन आणि तृणधान्याची दुबार पेरणी करावी लागली. कापसाचे पीक कोठेही मोडण्याची वेळ आलेली नाही. धुळे जिल्ह्यातही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. जळगावातही काही भागांचा अपवाद वगळला तर मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. कापसासह कडधान्ये, तृणधान्ये व गळीतधान्यांची वाढ चांगली दिसत आहे.

खानदेशात सुमारे ७ लाख हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक साडेचार लाख हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्र आहे. याबरोबरच जवळपास ८० हजार हेक्‍टरवर ज्वारी व बाजरी आहे. तर, सोयाबीनची पेरणी यंदा मागील हंगामाच्या तुलनेत सुमारे १ हजार हेक्‍टरने कमी झाल्याचे सांगण्यात आले. पेरणी जवळपास साडेअठ्ठावीस हजार हेक्‍टरवर झाली आहे.

इतर बातम्या
दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी...सिंधुदुर्ग  ः कर्जमुक्त आणि दुष्काळमुक्त असा...
मागण्या मंजूर झाल्याने ग्रामसेवकांचे...अकोला  ः विविध मागण्यांसाठी राज्यात २२...
उदयनराजे भोसले यांचा अखेर भाजपमध्ये...नवी दिल्ली  : राष्ट्रवादी काँग्रेसचे...
अनुदान अर्जांना १०० टक्के पूर्वसंमती...पुणे : कृषी विभागाच्या विविध योजनांमधील...
गुरुवारपासून पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशी विश्रांती घेतल्यानंतर अरबी...
कीडनाशके विक्री पात्रतेचा तिढा सुटलापुणे : देशात कीडनाशके विक्रीसाठी शैक्षणिक...
‘अमूल’कडून राज्यात कडवे आव्हानपुणे : राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत...
औषधी गुणधर्म लक्षात घेता, पेरू, शेवगा...सोलापूर ः ‘‘पेरू आणि शेवगा ही तशी दुर्लक्षित पिके...
मॉन्सूनचा मुक्काम लांबणारपुणे : निम्मा सप्टेंबर उलटूनही परतीच्या...
वंचित, कष्टकरी संघटना विधानसभा लढविणार...पुणे  : राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात...
अकोला जिल्ह्यात हजारो हेक्टर शेती नापेरअकोला ः अनियमित पावसाचा यंदा खरिपाला मोठा फटका...
नाशवंत शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी...पुणे : राज्यातील नाशवंत शेतमालाचे काढणीपश्‍चात...
भंडारा जिल्‍ह्यात पावसामुळे शेकडो हेक्‍...भंडारा ः मध्य प्रदेशातील संततधारेमुळे जिल्ह्यात...
सांगली येथे गूळ ३२०० ते ३८७५ रुपये...सांगली  : येथील बाजार समितीत शनिवारी (ता. १४...
`कांदा आयातीचे धोरण शेतकऱ्यांना...पुणे  : कांदा आयात करण्याचे केंद्र सरकारचे...
स्मार्ट ग्रामअंतर्गत सायखेडा, गिरोली,...वाशीम ः जिल्हा परिषद पंचायत विभागातर्फे...
जळगाव जामोद येथे फिरते मासळी विक्री...बुलडाणा  : मत्स्यव्यवसाय आणि नियोजन...
कृषी विज्ञान केंद्र मालेगावकडून...नाशिक : कृषी विज्ञान केंद्र, मालेगाव महाराष्ट्र...
साठवणीसाठी खरेदी नसल्याने चीनमध्ये...चीनी आहारामध्ये लसणांचा वापर मोठ्या प्रमाणात होत...
अकोला जिल्हा बँकेची पूरग्रस्तांना १६...अकोला  ः सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील...