खानदेशात पेरणी १३५ टक्क्यांवर

जळगाव ः खानदेशात रब्बीची पेरणी १३५ टक्क्यांवर पोचली आहे. जळगाव जिल्ह्यातील पेरणी १५० टक्क्यांवर गेली आहे.
Sowing in Khandesh at 135 per cent
Sowing in Khandesh at 135 per cent

जळगाव ः खानदेशात रब्बीची पेरणी १३५ टक्क्यांवर पोचली आहे. जळगाव जिल्ह्यातील पेरणी १५० टक्क्यांवर गेली आहे. तर धुळे व नंदुरबारातील पेरणीदेखील १०० टक्के झाल्याची स्थिती आहे. 

बाजरी पेरणी सुरू आहे. तसेच कांदा लागवडही झाली आहे. हे क्षेत्र लक्षात घेता पेरणी आणखी वाढेल, असे दिसत आहे. खानदेशात एकूण चार लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी होणार आहे. जळगाव जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र ९२ हजार हेक्टर आहे. परंतु जळगाव जिल्ह्यात पेरणी सुमारे दीड लाख हेक्टरवर झाली आहे.

धुळ्यात सुमारे ३८ हजार हेक्टर एवढे रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र आहे. पण तेथेही पेरणी ४० हजार हेक्टरवर झाली आहे. तर नंदुरबारात सर्वसाधारण क्षेत्र सुमारे ३० हजार हेक्टर असून, तेथेही पेरणी ३१ हजार हेक्टरपेक्षा अधिक झाली आहे. 

जळगाव जिल्ह्यातील पेरणीसंबंधीची अंतिम माहिती लवकरच जारी केली जाणार असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. बाजरीची पेरणी सुरू असल्याने ही माहिती पुढील १५ दिवसात अंतिम होईल. जळगाव जिल्ह्यात रब्बीची पेरणी १५० टक्क्यांवर जाईल. 

खानदेशात सुमारे एक लाख हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी अपेक्षित आहे. त्यापाठोपाठ तृणधान्यांची पेरणी होईल. मक्याची लागवड कमी झाली आहे. खानदेशात सुमारे ४० हजार हेक्टरवर मका पीक आहे. गेल्या वर्षी ६० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात मक्याची लागवड झाली होती. लष्करी अळी, कमी उत्पादन, खर्च व कमी दर यामुळे मका लागवडीवर परिणाम दिसत आहे.

‘अनेर’मधून आवर्तन सुटले

जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षी रब्बीची पेरणी २०० टक्क्यांवर झाली होती. पाणी मुबलक असल्याने गिरणा, हतनूर धरणाच्या लाभक्षेत्रातील पेरणीदेखील १०० टक्क्यांवर जळगाव जिल्ह्यात झाली आहे. धुळ्यातील शिरपुरातही अनेर धरणातून रब्बीसाठी पाणी सोडले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com