Agriculture news in Marathi Sowing in Khandesh at 90% | Agrowon

खानदेशात पेरणी ९० टक्‍क्‍यांवर

टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 जुलै 2020

जळगाव ः खानदेशात पेरणी जवळपास पूर्ण होत आली आहे. सुमारे ९० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून, मागील दोन-तीन दिवसांत अनेक भागांत पाऊस झाला आहे. वाफसा स्थितीत मिळताच कडधान्य, तृणधान्य व कापूस पिकात आंतरमशागतही सुरू आहे.

जळगाव ः खानदेशात पेरणी जवळपास पूर्ण होत आली आहे. सुमारे ९० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून, मागील दोन-तीन दिवसांत अनेक भागांत पाऊस झाला आहे. वाफसा स्थितीत मिळताच कडधान्य, तृणधान्य व कापूस पिकात आंतरमशागतही सुरू आहे.

आंतरमशागत उरकून लागलीच रासायनिक खतांची मात्राही शेतकरी देत आहेत. तापी, गिरणाकाठी काही भागात तर उडीद, मूग पिकात दुसऱ्यांदा आंतरमशागत सुरू झाली आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा, शिरपूर भागात सर्वच पिकांची स्थिती बरी आहे. जळगाव जिल्ह्यात जळगाव, भुसावळ, जामनेर, बोदवड, यावल भागात ज्वारी, मूग, सोयाबीन ही पिके मोडण्याची वेळ आली. नव्याने पेरणीदेखील झाली. नंतर पाऊस आल्याने ही पेरणी यशस्वी झाल्याची स्थिती आहे.

जळगाव जिल्ह्यात सुमारे ९२ टक्के, धुळ्यात ९० टक्के तर नंदुरबारातही ९२ टक्‍क्‍यांपर्यंत पेरणी पूर्ण झाली आहे. कापसाची लागवड सर्वाधिक झाली असून, ती सुमारे साडेआठ लाख हेक्‍टरवर झाली आहे. पूर्वहंगामी कापूस लागवडही सुमारे ६० ते ७० हजार हेक्‍टरवर खानदेशात झाली आहे.

कांद्यासाठी क्षेत्र नापेर
खरिपातील कांद्याची लागवड ऑगस्टच्या मध्यापासून सुरू होणार आहे. यामुळे संबंधित क्षेत्र शेतकऱ्यांनी नापेर ठेवले आहे. त्यात मशागत करून घेतली जाते. तसेच कांदा रोपवाटिकादेखील या क्षेत्रात तयार केल्या आहेत. खानदेशात सुमारे १२ ते १४ हजार हेक्‍टरवर खरिपातील कांद्याची लागवड अपेक्षित आहे. कांदा लागवडीनंतर खानदेशातील नापेर क्षेत्र आणखी कमी होणार आहे. तसेच या आठवड्यात बाजरी, तागाची पेरणीदेखील पूर्ण होणार आहे. यामुळे खानदेशातील पेरणीची टक्केवारी  
वाढणार आहे.

पाच टक्के क्षेत्र नापेर राहणार
खानदेशात पेरणी ९० टक्‍क्‍यांवर पोचलेली असली तरी किमान पाच ते सहा टक्के क्षेत्र नापेर राहू शकते. या क्षेत्रात रब्बी हंगामात ज्वारी, हरभरा यांची पेरणी केली जाईल. काही शेतकऱ्यांनी जमिनीचा पोत टिकून राहावा यासाठी क्षेत्र नापेर ठेवण्याचे नियोजन केले आहे.


इतर ताज्या घडामोडी
अमरावती विभागात कर्जवाटपात...यवतमाळ : पीककर्ज वाटपासाठी शासनाने बँकांना...
आदिवासींच्या जमिनींचा शोध घेण्यासाठी ‘...बुलडाणा : संग्रामपूर तालुक्यातील चिचारी येथील...
यवतमाळमध्ये ६५ लाखांचे बोगस बीटी...यवतमाळ : जिल्ह्यात खरिपाची लगबग सुरू आहे. याचा...
काळ्याफिती लावून किसानपुत्रांचे आंदोलनआंबेजोगाई, जि. बीड : किसानपुत्र आंदोलनाच्या...
हमीभावाने एक हजार क्विंटल मका खरेदीऔरंगाबाद : आधारभूत किमतीने शेतीमाल खरेदी...
नांदेडमध्ये खरीप पेरणी सुरूनांदेड : जिल्ह्यात जून महिन्याच्या प्रारंभापासून...
पुणे जिल्ह्यातील आठवडी बाजार बंदचपुणे : ग्रामीण भागातील अर्थ व्यवस्थेचा कणा असलेले...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत तीन...औरंगाबाद : यंदाच्या खरीप हंगामात १५ जून...
जळगाव जिल्ह्यातील कृषी केंद्रांची तपासणीजळगाव ः जिल्ह्यात कृषी केंद्रांमधील बियाणे साठा,...
नगरमध्ये साडेपाच हजार हेक्टरवर फळबाग... नगर : नगर जिल्ह्यात गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही...
मराठवाड्यात पीककर्ज वाटप धीम्या गतीनेच औरंगाबाद : मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी...
कोल्हापुरात पाऊस सुरूच; नद्यांच्या...कोल्हापूर : जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाच्या...
साखर कारखान्यांच्या कर्जांची चौकशी करानगर : शेतकऱ्यांना पीककर्ज द्यायचे झाल्यास अत्यंत...
राष्ट्रीयीकृत बँकांच्या मदतीने...नाशिक : नाशिक जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून कर्ज...
‘किसानपुत्र आंदोलन’कडून काळ्या...औरंगाबाद : किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने शुक्रवारी...
द्राक्ष सल्ला : प्रतिकूल ढगाळ हवामानात...यावर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ढगाळ...
थायलंडचे शेतमजूर अन् मध्यम मार्गावरील...शेती म्हटली की सर्वत्र कमी जास्त प्रमाणात त्याच...
विदर्भात अडीच कोटींचा ‘एचटीबीटी’ साठा...नागपूर : गेल्या हंगामात अनधिकृत कापूस बियाण्याचे...
वैयक्तिक वनदाव्यांचा जलदगतीने निपटारा...नाशिक : जिल्ह्यातील वैयक्तिक वनदाव्यांचा वनसमिती...
कोल्हापुरातील शिवारे जलमयकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता. १६)...