Agriculture news in Marathi Sowing kharif on seven lakh hectare in Pune division | Agrowon

पुणे विभागात खरिपाचा सव्वासात लाख हेक्टरवर पेरा

टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 जुलै 2020

पुणे ः जूनच्या सुरुवातील पुणे विभागातील अनेक भागांत दमदार पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी सुरू केली आहे. सध्या विभागात मोठ्या प्रमाणात पेरण्या झाल्या आहेत. अनेक ठिकाणी पिके वाढीच्या अवस्थेत आहेत.

पुणे ः जूनच्या सुरुवातील पुणे विभागातील अनेक भागांत दमदार पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी सुरू केली आहे. सध्या विभागात मोठ्या प्रमाणात पेरण्या झाल्या आहेत. अनेक ठिकाणी पिके वाढीच्या अवस्थेत आहेत.

पुणे विभागात खरिपाचे सरासरी क्षेत्र आठ लाख ६६ हजार ८१९ हेक्टर असून त्यापैकी सात लाख ३४ हजार ५३२ हेक्टरवर म्हणजेच ८४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सध्या पावसाने काही प्रमाणात उघडीप दिली आहे. पुरेसा पाऊस झाल्याने पेरणी क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

विभागातील  नगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील बहुतांशी भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. सध्या नगर जिल्हयातील काही भागात खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या आहे. तर काही ठिकाणी शेतकरी पेरणीयोग्य पावसाच्या प्रतिक्षेत आहे. अकोले तालुक्यात तालुक्यात सुमारे एक हजार ८६२ हेक्टरवर भात रोपवाटिका तयार झालेल्या आहेत.

पुणे जिल्हयामध्ये बाजरी, तूर, मुग, मका, भूईमूग व सोयाबीन पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. काही ठिकाणी अजूनही पेरण्या सुरू आहेत. मावळ,मुळशी, भोर, वेल्हा, जुन्नर, आंबेगाव तालुक्यात भात व नाचणीची रोपे वाढीच्या अवस्थेत आहेत. काही ठिकाणी भात पुर्नलागवडीची कामे सुरू झाली आहेत. आत्तापर्यत तीन हजार १८० हेक्टरवर भाताच्या पुर्नलागवडी झाल्या आहेत.

सोलापूरमध्ये चांगल्या प्रमाणात पेरण्या झाल्या असून बाजरी, मका, उडीद, मूग, तूर व सुर्यफूल ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. अनेक ठिकाणी पिकांची उगवण समाधानकारक असली तरी बार्शी तालुक्यातील गौडगाव व उपळे भागातील शेतकऱ्यांनी सोयाबीन उगवणीबाबत तक्रारी केल्या आहेत.

पुणे विभागात झालेली पेरणी (हेक्टर)
जिल्हा  सरासरी क्षेत्र  पेरणी झालेले क्षेत्र  टक्केवारी
नगर  ४,४७,९०४  ४,२४,६४३  ९४
पुणे १,८४,२७४  ९२,२७४  ५०
सोलापूर २,३४,६४१ २,१७,६१५ ९२
एकूण ८,६६,८१९ ७,३४,५३२ ८४

 


इतर ताज्या घडामोडी
पीककर्जाची प्रकरणे तत्काळ मार्गी लावा...नाशिक ः ‘‘छत्रपती शिवाजी महाराज सन्मान...
नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या दरात...नाशिक : सोमवारी (ता. २३) जिल्ह्यातील प्रमुख बाजार...
कुरखेड्यात ‘महावितरण’वर शेतकऱ्यांचा...गडचिरोली : कृषी पंपाच्या फिडरवर सुरू असलेले...
बुलडाणा जिल्ह्यात गुलाबी बोंडअळीने...बुलडाणा : जिल्ह्यात सुमारे १७४ गावांत गुलाबी...
मठपिंपळगाव-गोलापांगरीत द्राक्षात खर्च,...अंबड, जि. जालना : मठपिंपळगाव-गोलापांगरी परिसरातील...
`नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना...नांदेड : अतिवृष्टी तसेच परतीच्या पावसामुळे...
बारामतीत हमीभावाने मका खरेदी सुरूपुणे ः बारामती येथील कृषी उत्पन्न बाजार...
नगरमध्ये कांदा चाळ अनुदानासाठी उपोषणनगर ः कृषी विभागाने पूर्वपरवानगी दिल्यानंतर...
जळगाव जिल्ह्यात केळीच्या विमा...जळगाव ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेतून...
वीजजोड तोडल्यास आसूडाचा प्रहारकऱ्हाड,  जि.  सातारा : लॉकडाउन काळातील...
सांगली जिल्ह्यात दूध संकलनात २५ हजार...सांगली ः ऑक्टोबर ते जानेवारीअखेर हा दूध...
पीकविमा हप्ता २७ नोव्हेंबरपूर्वीच भरा...सिंधुदुर्ग : बदलत्या वातावरणामुळे जिल्ह्यातील...
‘वान’च्या पाण्याविरुद्ध नागरिकांचे धरणे अकोला : तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्पाचे पाणी...
जळगावात भरताची वांगी १८०० ते २६०० रुपये जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
मराठवाड्यात कापसाच्या दरात किंचित...औरंगाबाद : खासगीत कापूस खरेदीचे दर किंचित...
परभणीत भाजपकडून वीजबिलांची होळी परभणी :  वाढीव वीज देयकांच्या निषेधार्थ...
खानदेशात ऊस लागवड वाढण्याची शक्यताजळगाव ः वाढती खासगी कारखानदारी व इतर...
जळगाव जिल्ह्यात कांदा बिजोत्पादन...जळगाव : जिल्ह्यात यंदा कांदा बिजोत्पादनाचे...
कलदगाव, नायगाव येथे कापूस खरेदी सुरु नांदेड  : भारतीय कपास निगमच्या (सीसीआय)...
अकोले बुद्रूकमध्ये वीज तारांच्या...सोलापूर ः विजेच्या खांबावरील विद्युत तारांचे...