परभणी जिल्ह्यात नऊ हजार ९७१ हेक्टरवर पेरणी

परभणी जिल्ह्यात नऊ हजार ९७१ हेक्टरवर पेरणी
परभणी जिल्ह्यात नऊ हजार ९७१ हेक्टरवर पेरणी

परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात गुरुवार (ता.१४) पर्यंत ९ हजार ९७१ हेक्टर (३.५९ टक्के) क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. अजून जमीन वाफशावर नसल्यामुळे, खरिपाची सुगीची कामे सुरु असल्यामुळे पेरणी लांबणीवर पडली आहे. सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्यामुळे, जमिनीत ओलावा उपलब्ध असल्यामुळे यंदा रब्बीच्या क्षेत्रात वाढ अपेक्षित आहे.

जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. यामध्ये ज्वारी १ लाख ५९ हजार ७८ हेक्टर, गहू ३० हजार ४७६ हेक्टर, हरभरा ५३ हजार २६४ हेक्टर, जवस १ हजार १९९ हेक्टर, सूर्यफुल १ हजार ९३ हेक्टर या पिकांचा समावेश आहे. ऑक्टोबर महिन्यात ज्वारी, करडई, हरभऱ्याची, तर नोव्हेबरमध्ये गव्हाची पेरणी केली जाते. परंतु यंदा ऑक्टोबरमध्ये दुसऱ्या पंधरावाड्यापासून नोव्हेबरच्या अनेक भागांत पाऊस सुरू राहिला. त्यामुळे खरिपाच्या सुगीसोबतच रब्बीची पेरणी रखडली. 

सप्टेबरच्या अखेरीस आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीस मूग, उडीद, तसेच लवकर काढणी झालेल्या सोयाबीननंतर सेलू, मानवत, पाथरी, परभणी तालुक्यातील काही गावातील शेतकऱ्यांनी ज्वारी, हरभऱ्याची पेरणी केली. परंतु सततच्या पावसामुळे उगवलेल्या ज्वारीच्या पिकामध्ये पाणी साचून राहिल्याने पीक पिवळे पडले, वाढ खुंटली आहे. हरभऱ्याची उगवण व्यवस्थितीत झाली नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे.

जिल्ह्यामध्ये गुरुवार (ता.१४) पर्यंत एकूण ९ हजार ९७१ हेक्टरवर परेणी झाली. पेरणी क्षेत्रामध्ये ज्वारीची ८ हजार १०९ हेक्टर (५.१० टक्के), हरभऱ्याची १ हजार ७९८ हेक्टर (३.३९ टक्के), करडईची ६४ हेक्टरवर (०.२५ टक्के) पेरणी झाली.

तालुकानिहाय  पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

तालुका सर्वसाधारण क्षेत्र पेरणी  टक्केवारी
परभणी  ७४३५५ १३५२ १.८२
जिंतूर २६६६९ १९५० ७.३१
सेलू ३८५५८ ४२०८ १०.९१
मानवत ९७१६  ३६५ ३.७६
पाथरी २४८४९ १०४८  ७.३१
सोनपेठ १८३१४ २८४ १.५५
गंगाखेड ४३७००  ५०२ १.१५
पालम   १९३२३  ६२ ०.३२
पूर्णा २१८८३ २००  ०.९१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com