agriculture news in Marathi sowing onion now on harvest Maharashtra | Agrowon

पेरलेला कांदा काढणीला 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

यंदा वातावरणामुळे रोपे सडली. लागवड झालेला कांदाही अर्ध्यावर मृत झाला. त्यात भावही तेजीत, पण रोपे नाही म्हणून थांबतील ते शेतकरी कसे.

येवला, जि. नाशिक : यंदा वातावरणामुळे रोपे सडली. लागवड झालेला कांदाही अर्ध्यावर मृत झाला. त्यात भावही तेजीत, पण रोपे नाही म्हणून थांबतील ते शेतकरी कसे. रोपे नसल्याने पारंपरिक लागवडीच्या पद्धतीवर पर्याय शोधत शेतकऱ्यांनी कांदा पेरणीचा पर्याय निवडला. जिल्ह्यात येवला, चांदवड व कसमादे भागांत अंदाजे एक हजार हेक्टरच्या आसपास क्षेत्रावर कांदा पेरणी झाली. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात ज्या शेतकऱ्यांनी कांदा पेरला तो काढणीयोग्य झाला असून, पुढील १०-१५ दिवसांत बाजारात येण्याची शक्यता आहे. 

सततच्या पावसामुळे पोळचे रोप, कांदे तसेच रांगडा व उन्हाळ कांद्याच्या रोपांची वाताहत झाली. रांगडा, लाल व उन्हाळ कांद्याचे रोप नसल्याने, बियाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने मोठी समस्या उभी राहिली. त्यामुळे यंत्राने पेरणीकडे कल वाढला. यंदा खरीप हंगामात झालेला अतिपाऊस, कडक ऊन, बुरशीजन्य आजाराचा प्रादुर्भाव यामुळे पोळ, लाल कांद्याची रोपे पूर्णपणे सडली. थोडाफार लागण झालेला पोळ कांदाही वाफऱ्यातच मृत झाल्याने तालुक्यात पोळ कांद्याचे उत्पादन या वर्षी निम्म्याने घटणार आहे. शिल्लक असलेला उन्हाळ कांदाच आता टप्प्याटप्याने मार्केटमध्ये नोव्हेंबर-डिसेंबरला दिसेल.

नव्या वर्षात जानेवारीमध्ये खऱ्या अर्थाने तालुक्यातील लाल कांदा बाजारात दिसेल असा जाणकारांचा अंदाज आहे. सायगाव येथील अनेक शेतकऱ्यांनी कांदा पेरणी केलेली असून, काहींचा कांदा काढणीला आला आहे. प्रगतिशील शेतकरी भागुनाथ उशीर यांनी पोळ कांदा उत्पादनावर निर्सगामुळे झालेल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत रेंडाळा-ममदापूर येथील शेतात दोन एकर पोळ कांद्याची पेरणी केली होती.

तालुक्यातील व परिसरातील पोळ लाल कांद्याची रोपे, कांदा लागवड संपूर्णपणे नष्ट होत असताना पेरलेल्या पोळ कांद्याचे नुकसान त्या प्रमाणात कमी झाले. सर्व बुरशीजन्य रोगांशी सामना करत ७५ टक्के कांदा सुरक्षित राहिला आहे. पेरल्यापासून ६ ते ७ कीटकनाशक फवारण्या केल्या आहेत. पेरलेला कांदाही वेळोवेळी विविध रोगांच्या प्रादुर्भावाला बळी पडत राहिल्याने १०५ दिवसांत म्हणजे साडेतीन महिन्यांत निघणारा कांदा १२० ते १२५ दिवसांत म्हणजे चार, सव्वाचार महिन्यांत काढणीला येणार आहे.

प्रतिक्रिया
मी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांनी विकसित केलेले बसवंत ७८० जातीचे बियाणे पेरले. यातून ४५ ते ५० क्विंटल एकरी कांदा उत्पादन होईल अशी खात्री आहे. लागवड केलेल्या कांद्याच्या तुलनेत पेरलेल्या कांद्याचा उत्पादन खर्च ३० टक्क्यांनी कमी आहे.
- भागुनाथ उशीर, प्रयोगशील शेतकरी, येवला 


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत सर्वच पक्षांकडून गुलालाची...औरंगाबाद : मतदानाची प्रक्रिया शांततेत पार...
पुणे जिल्ह्यात संमिश्र निकाल; दावे-...पुणे ः जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये...
साताऱ्यात स्थानिक आघाड्यांचा जल्लोषसातारा ः दोन दिवसांपूर्वी मतदान झाले. गेले दोन...
नांदेड जिल्ह्यात प्रस्थापितांनी सत्ता...नांदेड : नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे...
नाशिक जिल्ह्यात प्रस्थापितांना धक्कानाशिक : जिल्ह्यात एकूण ६२१ ग्रामपंचायतीच्या...
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या...यवतमाळ : माजी मुख्यमंत्री व जलक्रांतीचे प्रणेते...
परभणी जिल्ह्यात संमिश्र यशपरभणी ः परभणी जिल्ह्यातील मतदान झालेल्या ४९८...
भाजपचे ४४, शिवसेनेचे २२ ग्रामपंचायतीवर...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतीपैकी...
नागपुरात संत्रा दरात तेजीनागपूर ः आंबिया बहाराचा हंगाम अंतिम टप्प्यात...
सांगलीत भाजपला धक्का;  महाविकास आघाडीला...सांगली : ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात...
रत्नागिरीत शिवसेनेला कौल रत्नागिरी : जिल्ह्यातील ३६० ग्रामपंचायतींचे निकाल...
सोलापुरात प्रस्थापितांना धक्कासोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ५९०...
उमरेड येथील महिलांनी स्थापन केली शेतकरी...उमरेड. जि. नागपूर : शेतीमधील विषम परिस्थितीची दखल...
स्वाभिमानीचा विजयासाठी संघर्षकोल्हापूर : कोण म्हणतंय येत नाही, आल्याशिवाय राहत...
‘ब्लॅक राइस’ बियाणे निर्मितीचे काम सुरुरत्नागिरी ः तालुक्यातील शिरगाव येथील कृषी संशोधन...
सोलापुरात वांगी, गाजराला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
विदर्भात महाविकास आघाडी, भाजपला संमिश्र...नागपूर : विदर्भात महाविकास आघाडी, भाजप प्रणीत...
वऱ्हाडात महाविकास आघाडीला यश अकोला : ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या...
जळगाव जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव...जळगाव : परभणी जिल्ह्यात आढळून आलेल्या ‘बर्ड फ्लू’...
भूक मंदावण्यावर सुंठ, जिरे, ओवा उपयुक्तजनावरांनी खाद्य न खाणे, त्याचे पोट गच्च होणे,...