मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक क्रांतिकारक पाऊल आहे.
ताज्या घडामोडी
कोल्हापुरात २३०० हेक्टरवर उन्हाळी पेरणी
कोल्हापूर : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची पेरणी सुरू आहे. तृणधान्य, गळीत धान्य आणि कडधान्य पिकांची २२९० हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली. उसाची एक लाख १२ हजार ९५२ हेक्टर नोंद झाली आहे. यंदाही उसाचे मागील वर्षी एवढे क्षेत्र होईल, तर यावर्षी १९ मंडलातील २०० गावांमध्ये शेतीच्या पाण्याची कमी प्रमाणात उपलब्धता आहे. तरीही, अपेक्षित उत्पादन मिळेल, असा अंदाज कृषी खात्याने व्यक्त केला.

जिल्ह्यात मार्च १५ अखेर तृणधान्यांमध्ये उन्हाळी भाताची २४४ हेक्टर क्षेत्र लागण झाली. मक्याची १७० हेक्टर असे एकूण ४०४ हेक्टरवर पेरणी झाली. गळीत धान्यामध्ये भुईमुगाचे ५८२ हेक्टर पेरणी झाली. गेली दोन वर्षे सुर्यफुलाच्या बोगस बियाणांमुळे व उसाच्या वाढत्या क्षेत्रामुळे सुर्यफुलाचे क्षेत्र घटले आहे. यामध्ये पन्हाळा तालुक्यात १०, राधानगरी १५, गगनबावडा ४०, करवीर पाच, कागल एक, असे ७४ हेक्टर सूर्यफुलाची पेरणी झाली. गळीत धान्याची एकूण ६५६ हेक्टर क्षेत्र पेरणी झाली. कडधान्याची २५ हेक्टर,भाजीपाला ३८१ हेक्टर, यंदा चारा पिके वाढून ८२४ हेक्टर पेरणी झाली. या पिकांसाठी ५ हजार हेक्टर क्षेत्र उद्दिष्ट असून याची ४५ टक्केपेरणी पूर्ण झाली.
ऊस लागवडीमध्ये आडसाली उसाचे सर्वाधिक क्षेत्र शिरोळ तालुक्यात ६६६५ हेक्टर झाले. सर्वसाधारण क्षेत्र ९१७१ असताना जिल्ह्यात एकूण १२ हजार ४७८ हेक्टरवर लागणी झाल्या. पूर्वहंगामी २५७३१ हेक्टर, सुरू लागणी २९१५६ हेक्टर, खोडवा ४५५८७ हेक्टर, एकूण लागणी ६७३६५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे.
उसाचे सर्वसाधारण एक लाख ४२ हजार ३३६ क्षेत्र असताना आतापर्यंत एक लाख १२ हजार ९५२ हेक्टर क्षेत्र उस लागवडीचे पूर्ण झाले आहे. उद्दिष्टापेक्षा ७९.३६ टक्के उस लागवड क्षेत्र पूर्ण झाली आहे. ही आकडेवारी कृषी खात्याने दिली असून साखर कारखान्याकडून आकडेवारी आल्यानंतर उसाच्या क्षेत्रात आणखी वाढ होणार आहे, असा अंदाज कृषी खात्याने व्यक्त केला. पुढच्या वर्षी ही साखर उत्पादन वाढणार असून पुन्हा उस दराचा प्रश्न निर्माण होईल, असे चित्र सध्या आहे.
- 1 of 1022
- ››