परभणीत रब्बीची ६२.२४ टक्के क्षेत्रावर पेरणी

परभणीत रब्बीची ६२.२४ टक्के क्षेत्रावर पेरणी
परभणीत रब्बीची ६२.२४ टक्के क्षेत्रावर पेरणी

परभणी : जिल्ह्यात यंदा कमी पावसामुळे उद्भवलेल्या दुष्काळी स्थितीची फटका रब्बी हंगामातील पेरणीला बसला आहे. जमिनीत पेरणीसाठी ओलावा नसल्यामुळे रब्बीचे १ लाख २ हजार २२१ हेक्टर एवढे क्षेत्र (३८ टक्के) नापेर राहिले आहे. यंदा जिल्ह्यात १ लाख ६८ हजार ४९० हेक्टरवर (६२.२४ टक्के) परेणी झाली आहे. ज्वारीच्या क्षेत्रात निम्म्याहून अधिक घट झाली आहे. गव्हाने सरासरी क्षेत्राचा टप्पा पार केला आहे. हरभऱ्याच्या पेरणी क्षेत्रात गतवर्षीपेक्षा घट झाली आहे. करडईचे क्षेत्रही कमीच राहिले आहे. परभणी, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड या पाच तालुक्यांमध्ये रब्बीची ५० टक्के पेक्षा कमी पेरणी झाली आहे.

जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ७० हजार ७१२ हेक्टर एवढे प्रस्तावित करण्यात आले होते. कृषी विभागातर्फे यंदाचे रब्बी क्षेत्र नुकतेच अंतिम करण्यात आले. त्यानुसार यंदा दुष्काळी स्थितीमुळे केवळ १ लाख ६८ हजार ४९० हेक्टरवर पेरणी झाली आहे. जमिनीत ओलावा नसल्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील रब्बी पिकांच्या क्षेत्रात विशेषतः ज्वारीचे क्षेत्रात निम्म्याहून अधिक घट झाली आहे. जायकवाडी प्रकल्पाचा डावा कालवा, करपरा मध्यम प्रकल्पाचा कालव्याची आवर्तनामुळे सिंचनासाठी पाणी मिळाले शिवाय विहिरी, बोअरच्या पाणीपातळीमध्ये काही प्रमाणात वाढ झाली.

त्यामुळे या प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात गहू, हरभरा घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल राहिला. गव्हाची २३ हजार ६४३ हेक्टरवर (११३.६५ टक्के) तर हरभऱ्याची ५३ हजार ८२७ हेक्टवर (९९.३३ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली. करडईचे या गळित धान्य पिकांच्या क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेली घट यंदाही कायम आहे. करडईची यंदा केवळ २ हजार ७४३ हेक्टरवर पेरणी झाली. ज्वारीचे क्षेत्र घटले असले तरी चारा पीक म्हणून ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी मक्याची २ हजार ३७ हेक्टरवर मक्याची पेरणी केली आहे.

तालुकानिहाय पेरणी क्षेत्राचा विचार केला असता पालम तालुका वगळता अन्य कोणत्याही तालुक्याने रब्बीच्या सर्वसाधारण क्षेत्राचा टप्पा ओलांडलेला नाही. परभणी, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड या पाच तालुक्यांमध्ये सरासरी क्षेत्राच्या ४०.९१ ते ४७.७७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली.

पीकनिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

पीक सर्वसाधारण क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी
ज्वारी  १७८४७८ ८३९७०  ४७.०५
गहू  २०८२२ २३६४३  ११३.५५
मका   १३५६  २०३७ १५०.१९
हरभरा ५४१८९ ५३८२७ ९९.३३
करडई  १३७८८ २७४३  १९.८९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com