agriculture news in Marathi, sowing permission for Fule Vikram grame seed in three state, Maharashtra | Agrowon

हरभऱ्याचा ‘फुले विक्रम’ वाणाला तीन राज्यांत लागवडीस मान्यता

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 सप्टेंबर 2019

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने अनेक वर्षे संशोधन करून ‘फुले विक्रम’ हा वाण संशोधित केला आहे. अधिक उत्पादनक्षमतेमुळे देश व राज्याच्या हरभरा उत्पादनात वाढ होण्यास मदत होण्यास मदत होईल. 
- डॉ. नंदकुमार कुटे, प्रमुख शास्त्रज्ञ, कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर 
 

नगर  ः महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कडधान्य सुधार प्रकल्पाने संशोधित केलेल्या ‘फुले विक्रम’ या वाणाच्या लागवडीला महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांत (देशातील मध्य विभागात)ही मान्यता देण्यात आली आहे. बिरसा कृषी विद्यापीठ, रांची (झारखंड) येथे झालेल्या हरभरा संशोधन आढावा बैठकीत ही मान्यता मिळाली आहे.

बिरसा कृषी विद्यापीठ, रांची (झारखंड) येथे २७ ते २९ ऑगस्ट अशी तीन दिवस या कालावधीत राष्ट्रीय पातळीवरील वार्षिक हरभरा संशोधन आढावा बैठक झाली. या बैठकीसाठी देशातील विविध राज्यांतून हरभरा संशोधक उपस्थित होते. या बैठकीत महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कडधान्य सुधार प्रकल्पाने विकसित केलेल्या देशी हरभऱ्याच्या ‘फुले विक्रम’ या वाणावर चर्चा झाली.

कंबाइन हार्वेस्टरने काढणी करता येणारा वाण असल्याने शेतकऱ्यांसाठी फायद्याचा असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर देशाच्या मध्य विभागासाठी (महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात) ‘फुले विक्रम’ हा वाण प्रसारित करण्यात आला आहे. हा वाण विकसित करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा तसेच संशोधन संचालक तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन सुरू होते. दहा वर्षांच्या संशोधनानंतर संशोधित केलेला हा देशातील तिसरा व राज्यातील पहिलाच वाण आहे, असे कडधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख डॉ. नंदकुमार कुटे यांनी सांगितले. 

‘फुले विक्रम’ वाणाची वैशिष्ट्ये

  • जमिनीपासून दोन फूट उंच वाढणारा, एक फुटावर घाटे लागतात. 
  • उंच असल्याने कंबाइन हार्वेस्टरने पिकाचे कुठलेही नुकसान न होता व्यवस्थित काढणी करता येते. 
  • मररोगाला प्रतिकार करणारा. पिवळसर मध्यम आकाराचे दाणे लागतात. 
  • उत्पादन क्षमता ४०-४२ क्विंटल प्रतिहेक्‍टर व सरासरी उत्पादन २२ क्विंटल प्रतिहेक्‍टर मिळते. 
  • बागायतीसह जिरायती भागालाही फायद्याचा वाण आहे. 
  • उशिराने लागवड केली, तरीही उत्पादनात फरक पडत नाही. 
  • यांत्रिक पद्धतीने काढता येत असल्याने पीक काढणीवरील खर्चात बचत होते 

इतर अॅग्रो विशेष
पावसाची सर्वदूर संततधार; धरणसाठ्यात वाढपुणे : गेल्या दोन दिवसापासून राज्यातील बहुतांशी...
राज्यात आज आणि उद्या पाऊस जोर धरणारपुणे :  गेल्या तीन ते चार दिवसापासून...
`सक्ती’चे होईल स्वागतयुरिया विकत घेताना सोबत जैविक (जीवाणू) खते...
देशाला स्वातंत्र्य मिळाले पण...शेतमालाचेच भाव का कोसळतात? कांदा, टोमॅटो ...
नवी बाजार व्यवस्था नवी आव्हानेसध्यातरी बाजार समितीचा कर नाही म्हणून व्यापारी...
आकडे, आरोग्य अन् आयातखाद्यतेलावरील आयातशुल्कात वाढ करून आयातीवर...
पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना... पुणे : ‘पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना...
द्राक्ष पीककर्ज कर्जमाफीत बसेना आणि...नाशिक : द्राक्षासाठी घेतलेले पीककर्ज  ...
कर्जमाफीसाठी दीड हजार कोटीमुंबई: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
जैविक खतांचा वापर सक्तीचा होणार पुणे: युरिया विकत घेताना जैविक खते देखील विकत...
राज्यातील पंधरा जिल्हा बँकांना ...लातूर ः राज्यातील अनेक जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
राज्यात पावसाची रिपरिप सुरुच पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात रिमझिम असून...
निकृष्ट बियाणेप्रकरणी ४० न्यायालयीन खटलेवाशीम ः यंदाच्या हंगामात निकृष्ट बियाण्यामुळे...
चांदोली धरणग्रस्त विस्थापीतांनी केली २५...मांगले, जि. सांगली ः  चांदोली धरणग्रस्तामधील...
लोकसहभागातून शेती अन् ग्रामविकासाला...उंबरीवाडी (ता.जावली,जि.सातारा) हे लहानसे गाव....
जलसंधारण मोहिमेतून पाणी टंचाईवर मातआजही माण, खटाव हे  दुष्काळी तालुका म्हणून...
पावसाचा जोर कायम राहणार पुणे: गुजरातच्या दक्षिण भागात चक्राकार...
कृषी अधीक्षक, उपसंचालकांच्या बदल्यापुणे : कोविड १९ रोगाच्या पार्श्वभूमीवर कार्यरत...
मका विक्रीचे चुकारे ४० दिवसांनंतरही थकितजळगाव ः जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार मका...
कोकणात मुसळधारेचा अंदाजपुणे ः  उत्तर प्रदेशचा नैऋत्य भाग ते...