जळगाव जिल्ह्यातील पेरणीचे नियोजन अयशस्वी

जळगाव जिल्ह्यातील पेरणीचे नियोजन अयशस्वी
जळगाव जिल्ह्यातील पेरणीचे नियोजन अयशस्वी

जळगाव : जिल्ह्यात गिरणा व इतर सिंचन प्रकल्पांमधून अजूनही रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आलेले नाही. जमिनीत ओलावा नसल्याने कोरडवाहू रब्बी हंगाम अपवाद वगळता कुठेही नाही. सिंचन प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात प्रकल्पातून पाणी आलेले नसल्याने पेरणीचे नियोजन यशस्वी झालेले नाही.

गिरणा धरणामुळे जवळपास २१ हजार हेक्‍टर क्षेत्राला लाभ होतो. वाघूरमुळेही सुमारे सात ते आठ हजार हेक्‍टर क्षेत्र भिजू शकते. हतनूरमुळेही सुमारे १५ ते १६ हजार हेक्‍टर क्षेत्रावर रब्बी हंगाम उभा राहू शकतो. परंतु कुठल्याही प्रकल्पातून रब्बीसाठी किती आवर्तने मिळतील, याचा निर्णय झालेला नाही. कालवा सल्लागार समिती व जलसंपदा विभाग यांच्यात चर्चा झालेली नाही. पिण्याच्या पाण्याचे आरक्षण मध्यंतरी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जाहीर झाले. पण रब्बीसाठी पाणी केव्हा मिळेल, हा प्रश्‍न आहे.

जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील शेती गिरणा धरणावरच अवलंबून आहे. खरिपात फटका बसला. रब्बी हंगाम भडगाव, पाचोरा भागात काही शेतकरी कोरडवाहू शेतात घेत होते. परंतु यंदा जमिनीत ओलावा नसल्याने कोरडवाहू पेरणी टाळली आहे. ज्वारीचे (दादर) चांगले उत्पादन या भागात घेतले जाते. चाळीसगाव, धरणगाव, एरंडोल तालुक्‍यासही गिरणा धरणाच्या पाण्याचा लाभ होतो. नदीत पाणी आल्यानंतर नदीकाठच्या गावांमधील विहिरी, कूपनलिकांची पाणीपातळीदेखील वाढते. यामुळे हरभरा, ज्वारीची पेरणी शेतकरी करू शकतील. गिरणा धरणात ४६ टक्के जलसाठा आहे. दोन आवर्तने शेतीला मिळावीत, अशी मागणी होत आहे.

गिरणा नदीला पाणी येईल, या अपेक्षेने काही गावांनजीक शेतकऱ्यांनी वाळूचे कच्चे बंधारे स्वखर्चाने, लोकवर्गणीतून बांधले आहेत. या बंधाऱ्यांसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींकडेही निधीची मागणी केली आहे. लोकप्रतिनिधी प्रतिसाद देत नसल्याने शेतकऱ्यांनी अधिकचा निधी गोळा करण्याचे नियोजन केले आहे. धरणगाव, जळगाव तालुक्‍यांत काही ठिकाणी असे बंधारे शेतकऱ्यांनी बांधले आहेत. हतनूर धरणाच्या पाण्याचा लाभ यावल, चोपडा, रावेर भागांतील शेतीला होतो. तीन आवर्तने या धरणातून मिळतील. कारण हे धरण १०० टक्के भरले होते. वाघूर धरणाच्या पाण्याचा लाभ जळगाव, भुसावळ तालुक्‍यांना होतो. या धरणातून दोन आवर्तने मिळू शकतात. पेरणीची मुदत संपत आहे. त्यापूर्वी पाणी सोडले जावे, अशी मागणी केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com