बुलडाणा जिल्ह्यात सव्वादोन लाख हेक्टरवर पेरणी शक्य

बुलडाणा:जिल्ह्यात परतीच्या पावसाने खरीप हंगामाचे नुकसान केले. मात्र, हाच पाऊस रब्बीसाठी पोषक मानला जात आहे.
 Sowing is possible on over 2 lakh hectares in Buldana district
Sowing is possible on over 2 lakh hectares in Buldana district

बुलडाणा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने खरीप हंगामाचे नुकसान केले. मात्र, हाच पाऊस रब्बीसाठी पोषक मानला जात आहे. पावसामुळे जिल्ह्यात यंदा सुमारे सव्वा दोन लाख हेक्टरवर रब्बी पेरणीचे नियोजन कृषी खात्याने केले आहे. यात प्रामुख्याने ५० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर हरभऱ्याची लागवड अपेक्षित धरली आहे.

जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र एक लाख ५७ हजार हेक्टर आहे. यंदा पोषक परिस्थितीमुळे ही लागवड दोन लाख २४ हजार हेक्टरपेक्षा अधिक राहू शकते. सोयाबीन काढणी अंतिम टप्प्यात आहे. काही जणांनी रब्बीची तयारी सुरु केली. हरभरा लागवडीला सुरवात झाली आहे. दिवाळीपर्यंत रब्बी लागवडीला आणखी वेग येऊ शकतो. सध्या जमिनीत मोठ्या प्रमाणात ओलावा असल्याने मशागतीचे काम शेतकऱ्यांनी हातात घेतले. 

या हंगामासाठी प्रकल्पांमध्येही तुडुंब साठा आहे. त्यातच खरिपात प्रामुख्याने मूग, उडीद हातातून गेल्यानंतर सोयाबीनचीही उत्पादकता कमी येत आहे. कपाशीमध्येही फारसे उत्पादन दिसत नाही. त्यामुळे शेतकरी रब्बीला पसंती देत आहेत.

गहू, मका, हरभरा, करडी, रब्बी ज्वारीची लागवड करणार आहेत. यानुसार हरभरा १ लाख ३१ हजार ५९०, गहू ६६५००, मका १४४००, रब्बी ज्वारी ११३०० अशी लागवड अपेक्षित आहे. पेरण्या लांबत गेल्यास हरभऱ्याचे क्षेत्र याहीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. 

बियाणे, खतांचे आधीच नियोजन 

रब्बी हंगामासाठी बियाणे व रासायनिक खतांचे आधीच नियोजन करण्यात आले आहे. या जिल्ह्यात रब्‍बीत विदर्भात सर्वाधिक मका लागवड क्षेत्र राहते. गेल्या काही हंगामात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा किती शेतकरी पसंती देतील, हे निश्‍चित सांगितले जात नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com