परभणी जिल्ह्यात रब्बीची अडीच लाख हेक्टरवर पेरणी

यंदा, पुरेशा पाण्यामुळे बागायतीच्या गहू, ऊस या क्षेत्रात वाढ झाली आहे. हरभऱ्याचे पेरणी क्षेत्र वाढले आहे. - संतोष आळसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, परभणी.
 sowing rabbi over 2.5 lakh hacter in Parbhani district
sowing rabbi over 2.5 lakh hacter in Parbhani district

परभणी : ‘‘जिल्ह्यातील सन २०१९-२० च्या रब्बी हंगामातील अंतिम पेरणी क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार यंदा जिल्ह्यात २ लाख ५३ हजार ६३७ हेक्टरवर (९१.४९ टक्के) क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. अनेक भागात जानेवारी महिन्यापर्यंत पेरणी सुरू होती. सिंचन स्रोतांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे गहू आणि हरभरा क्षेत्रात मोठी वाढ झाली. या पिकांची सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मात्र, ज्वारी आणि करडईच्या क्षेत्रात घट झाली आहे,’’ असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

महसूल आणि कृषी विभागातर्फे यंदाच्या (२०१९-२०) हंगामातील रब्बी पिकांचे अंतिम क्षेत्र निश्चित करण्यात आले. 

सिंचनासाठी पाणी उपलब्ध असल्यामुळे ऊस लागवड झाली आहे. त्यामुळे काही तालुक्यातील रब्बीच्या क्षेत्रात घट झाली आहे. परंतु, गतवर्षीच्या तुलनेत यंदा रब्बीच्या पेरणी क्षेत्रात ८५ हजार १४७ हेक्टरने वाढ झाली आह. जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ७७ हजार २२८ हेक्टर आहे. त्यात ज्वारी १ लाख ५९ हजार ७८ हेक्टर, गहू ३० हजार ४७६ हेक्टर, हरभरा ५३ हजार ६४ हेक्टर, जवस १ हजार ३९७ हेक्टर, सूर्यफूल ४ हजार ४६१ हेक्टर आहे.  

जानेवारी अखेरपर्यंत जिल्ह्यात २० हजार ६५१ हेक्टरवर ऊस लागवड झाली. परभणी, सेलू, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम तालुक्यात सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा कमी, जिंतूर, मानवत, पूर्णा तालुक्यात जास्त पेरणी झाली.

पीकनिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

पीक  सर्वसाधारण पेरणी क्षेत्र टक्केवारी
ज्वारी १५९०७८  १११९६१ ७०.३८
गहू ३०४७६ ४२०३७ १३७.९३
हरभरा ५३०६४  ९४८०८ १७८.६७
करडई २५२०९ २२५८ ८.९६
जवस १३९७ ५९  ४.१२
सूर्यफूल ४४६१ ५० १.१२
मका ९०६ १७३३ १९१.२८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com