वऱ्हाडात जमिनीतील ओलीमुळे रब्बीची पेरणी संथगतीने

जमिनीतील ओलीमुळे रब्बीची पेरणी संथगतीने
जमिनीतील ओलीमुळे रब्बीची पेरणी संथगतीने

अकोला : मॉन्सूनोत्तर पावसाने मोठा मुक्काम केल्याने यंदाचा रब्बी लांबत चालला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या एक टक्कासुद्धा क्षेत्र रब्बी लागवडी खाली आलेले नाही. कृषी खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १३०२ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. जिल्ह्याचे सरासरी क्षेत्र एक लाख १५ हजार हेक्टर असून यंदा १ लाख ४९८०० हेक्टरचा लक्ष्यांक घेण्यात आला आहे. या तुलनेत लागवड झालेले हे क्षेत्र अत्यंत कमी आहे. यंदाच्या मोसमात शेतकऱ्यांना विचित्र परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. अतिपावसाने काढणीला आलेली खरिपातील पिके हातातून गेली. सध्या जिल्ह्यात बहुतांश भागात जमिनीत वाफसा आलेला नाही. यामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना विलंब झाला. रब्बी लागवडीसाठी मुळात उशीर होत आहे. अजूनही एक आठवडा तरी रब्बीची लागवड जोमाने सुरू होण्याची चिन्हे नाहीत. ज्या शेतकऱ्यांकडे वाफसा तयार झाला त्यांनी पेरणीसाठी पुढाकार घेत लागवड केली. आतापर्यंत झालेल्या लागवडीत हरभरा ८१४ हेक्टरवर पेरण्यात आला आहे. याशिवाय कांद्याची १६० हेक्टर तर भाजीपाला २६८ आणि गव्हाची ६० हेक्टरवर पेरणी झाली आहे. रब्बी पिकांच्या लागवडीला सध्या विलंब होत आहे. मात्र, अद्याप थंडीचा जोर वाढलेला नाही. पुढील काळात थंडीचा जोर वाढून रब्बी पिकांसाठी फायदेशीर ठरेल, अशी अपेक्षा शेतकरी बाळगत आहे. त्यामुळे पेरण्यांना विलंब होत असला तरी त्याचा उत्पादनाच्या दृष्टीने फारसा फरक पडेल, अशी शक्यता नसल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.   वाशीम जिल्ह्यातही अद्याप पेरणीने अपेक्षित वेग घेतलेला नाही. शेतकरी शेती तयार करण्याच्या कामात व्यस्त झालेला आहे. या जिल्ह्यातही पुढील आठवड्यापासून गूह, हरभरा लागवड वाढणार असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. यंदा प्रकल्पांमध्ये पाणीसाठा झालेला असून डिसेंबरपासून सिंचनासाठी पाणी देण्याचे नियोजन पाटबंधारे खात्याकडून करण्यात आले आहे. प्रकल्पातील साठा लक्षात घेता मार्चपर्यंत सिंचनासाठी पाणी मिळावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी नोंदविलेली आहे. एकूणच ही परिस्थिती रब्बी हंगामासाठी पोषक असल्याने यंदा लागवड क्षेत्र किमान दीडपट वाढण्याची अपेक्षासुद्धा व्यक्त होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com