खानदेशात रब्बी पिकांची पेरणी २५ टक्क्यांवर

खानदेशात रब्बी हंगामातील पिकांची पेरणी गतीने सुरू आहे. कोरडवाहू दादर ज्वारी, हरभऱ्याची पेरणी १०० टक्के आटोपली आहे. सध्या गहू, मका पिकाची लागवड, पेरणी अनेक भागात सुरू आहे. सुमारे २५ टक्के पेरणी पूर्ण झाल्याची माहिती आहे.
 खानदेशात रब्बी पिकांची पेरणी २५ टक्क्यांवर  Sowing of rabi crops in Khandesh at 25%
खानदेशात रब्बी पिकांची पेरणी २५ टक्क्यांवर Sowing of rabi crops in Khandesh at 25%

जळगाव :  खानदेशात रब्बी हंगामातील पिकांची पेरणी गतीने सुरू आहे. कोरडवाहू दादर ज्वारी, हरभऱ्याची पेरणी १०० टक्के आटोपली आहे. सध्या गहू, मका पिकाची लागवड, पेरणी अनेक भागात सुरू आहे. सुमारे २५ टक्के पेरणी पूर्ण झाल्याची माहिती आहे. खानदेशात सुमारे चार लाख हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी होईल. हरभऱ्याची खानदेशात सुमारे सव्वा लाख हेक्टरवर  पेरणी अपेक्षित आहे. या सोबत मक्याची देखील सुमारे एक लाख हेक्टरवर लागवड होईल. कोरडवाहू हरभऱ्याची पेरणी तापी, गिरणा, पांझरा नदीकाठी अधिक आहे. सध्या कृत्रीम जलसाठाधारक शेतकरी संकरित प्रकारच्या काबुली हरभऱ्याची पेरणी करण्याचे नियोजन करीत आहेत. या हरभऱ्याची पेरणी चोपडा, रावेर, जळगाव भागात अधिक होईल. गव्हाची पेरणी सुमारे १५ हजार हेक्टरवर झाली आहे. मक्याची लागवड सुमारे १० हजार हेक्टरवर झाली आहे. तर हरभऱ्याची सुमारे ३५ ते ४० हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. अनेक शेतकरी गुलाबी बोंड अळीमुळे कापसाखालील क्षेत्र रिकामे करीत असून, त्यात गहू, मका लागवडीचे नियोजन करीत आहेत. ही पेरणी याच महिन्यात पूर्ण होईल. तसेच डिसेंबरमध्ये मका, गहू व कांदा लागवड होईल. खानदेशात कांद्याची सुमारे १२ ते १४ हजार हेक्टरवर लागवड अपेक्षित आहे. ही लागवड डिसेंबरमध्ये होईल. पेरणीला या आठवड्यात गती येईल. सणासुदीमुळे शेतकरी, शेतमजूर शेतात फारसे कार्यरत नव्हते. फक्त सिंचन व कापूस वेचणी, पूर्वमशागत याची कामे काही प्रमाणात सुरू होती. या आठवड्यात पेरणी वाढून पेरणीचे आकडे झपाट्याने वाढतील, असाही अंदाज आहे. धुळे, जळगाव जिल्ह्यात पेरणी ११० टक्क्यांपेक्षा अधिक होईल. जळगाव जिल्ह्यात रब्बी हंगामाचे अपेक्षित क्षेत्र सव्वा लाख हेक्टर असते. परंतु यंदा ही पेरणी दोन लाख ५० हजार हेक्टरपेक्षा अधिक असणार आहे. पुढील महिन्यात गिरणा, वाघूर, हतनूर धरणातून पिकांसाठी पाण्याचे आर्वतनही सोडले जाईल, अशी माहिती मिळाली. यामुळे रब्बी हंगाम पुढे जोर धरणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com