नांदेड जिल्ह्यात रब्बीची पेरणी पावणेतीन लाख हेक्टरवर नियोजित

यंदा सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे रब्बीच्या क्षेत्रात वाढ अपेक्षित धरून शेतकऱ्यांना बियाणे, खते उपलब्ध करूनदेण्यासाठी नियोजन केले आहे. - संतोष नादरे, जिल्हा कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड.
नांदेड जिल्ह्यात रब्बीची पेरणी पावणेतीन लाख हेक्टरवर नियोजित
नांदेड जिल्ह्यात रब्बीची पेरणी पावणेतीन लाख हेक्टरवर नियोजित

नांदेड  : ‘‘जिल्ह्यात यंदाच्या (२०१९-२०) रब्बी हंगामात २ लाख ८३ हजार ७४९ हेक्टवर पेरणी नियोजित करण्यात आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत पाऊस जास्त झाल्यामुळे जमिनीत ओलावा उपलब्ध आहे. सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता झाल्यामुळे रब्बी पिकांच्या क्षेत्रात यंदा वाढ अपेक्षित आहे. शेतकऱ्यांना पेरणीसाठी बियाणे, खते आदी निविष्ठा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महाबीज आणि खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांकडे विविध पिकांच्या ७४ हजार ४१७ क्विंटल बियाणे आणि २ लाख २० हजार २९० टन खतांची  मागणी करण्यात आली,’’ अशी माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांचे सरासरी क्षेत्र १ लाख ६२ हजार ४०२ हेक्टर आहे. यामध्ये ज्वारी २८ हजार ९७९ हेक्टर, गहू २४ हजार ६५२, हरभरा ९५ हजार ८५९, मका १ हजार १४२, करडई ३ हजार २६९, सूर्यफूल ७५२, भुईमूग ६ हजार ५७३, तर इतर पिके १ हजार १७६ हेक्टरवर असतील. 

यंदाच्या खरिपात सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक आहे. त्यामुळे सोयाबीन काढणीनंतर हरभरा, सिंचनासाठी पाणी असलेल्या भागात गव्हाचा पेरा वाढण्याची शक्यता आहे. मूग, उडदानंतर ज्वारीची पेरणी होऊ शकते. सद्यःस्थितीत ज्वारी पेरणीसाठी जमिनीत ओलावा आहे. त्यामुळे तिच्या क्षेत्रातदेखील वाढ अपेक्षित आहे. यंदा ज्वारी ४९ हजार ९०३ हेक्टर, गहू ४९ हजार ५६८, हरभरा १ लाख ६९ हजार ३००, करडई ५ हजार ९३७, सूर्यफूल ५०३, भुईमूग ६ हजार ७००, मक्याची ८६८, तर अन्य पिकांची १ हजार १७६ हेक्टरवर पेरणी नियोजित आहे. 

बियाण्यांची ७४ हजार क्विंटलवर मागणी

गेल्या तीन वर्षांत प्रतिहेक्टरी ३५५ किलो याप्रमाणे वापर करण्यात आला. विविध पिकांच्या सरासरी ४१ हजार २६२ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली. यामध्ये २०१६ मधील ४५ हजार ५४६ क्विंटल, २०१७ मधील ३२ हजार ९६१ क्विंटल, २०१८ मधील ४५ हजार २८० क्विंटल बियाण्यांचा समावेश आहे. 

यंदा वाढीव क्षेत्रानुसार बियाणे प्रतिहेक्टरी ५५५ किलो करण्यात आले. महाबीजकडे १८ हजार ७८४ क्विंटल, राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडे ५ हजार, खासगी कंपन्यांकडे ५० हजार ६३३ अशी एकूण ७४ हजार ४१७ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली. यामध्ये ज्वारीच्या ३ हजार ९९२, गव्हाच्या ३९ हजार ६५४, हरभऱ्याच्या २५ हजार ३९५, मक्याच्या १०४, करडईच्या ४७५, सूर्यफुलाच्या ५०, भुईमुगाच्या ४ हजार ६००, अन्य पिकांच्या १४६ क्विंटल बियाण्यांचा समावेश आहे.

खतांची २ लाख २० हजार टन मागणी

विविध ग्रेडच्या २ लाख २० हजार २९० टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली. यामध्ये युरिया ८९ हजार २५० टन, पोटॅश १२ हजार ६००, सुपर फास्फेट २६ हजार २५०, डीएसपी ३४ हजार ४४०, तर संयुक्त खते ५७ हजार ७५० टन मागविण्यात आली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com