agriculture news in marathi, sowing scarcity due to lack of rain, pune, maharashtra | Agrowon

पावसाअभावी पुणे जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या
टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 जून 2018

यंदा चांगल्या पावसाचा अंदाज जाहीर झाला असल्याने मी दोन एकरांवर पेरणीचे नियोजन केले होते. खरिपाच्या तोंडावर पाऊस गायब झाला असल्याने अजूनही पेरणी केलेली नाही. येत्या महिनाअखेर पाऊस झाल्यास पेरणी करता येणार आहे.
- गीताराम कदम, न्हावरे, ता. शिरूर, जि. पुणे.

पुणे : गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिली आहे. ऐन खरिपाच्या तोंडावर पावसाने दांडी मारल्याने पुणे जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकरी द्विधा मनःस्थितीत असून पाऊस न झाल्यास मोठे नुकसान होण्याची शक्‍यता आहे.

यंदा जिल्ह्यात २ लाख ३० हजार हेक्‍टरवर पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाचा होता. त्यानुसार खते, बियाणे वाटपाचे नियोजन कृषी विभागाने केले होते. सध्या जिल्ह्यातील सर्व भागात निविष्ठांचा पुरवठा सुरू आहे. त्यामुळे आर्थिक अडचणी असतानाही पीक कर्ज घेऊन शेतकरी हंगामाचे नियोजन करीत आहे.

पश्‍चिम पट्ट्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, खेड, जुन्नर, आंबेगाव या तालुक्‍यांत भात रोपवाटिकेची कामे सुरू आहेत. पूर्वेकडील पट्ट्यात खेड, शिरूर, दौंड, इंदापूर, पुरंदर, हवेली, बारामती तालुक्‍यात मशागतीची कामे अंतिम टप्यात असून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यात भाताव्यतिरिक्त सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांची सुमारे दीड लाखाहून अधिक हेक्‍टरवर पेरणी होण्याची शक्‍यता होती.

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील काही भागांत पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्साहात पेरण्यांना सुरवात केली होती. परंतु गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने अनेक भागांत पेरण्या खोळंबल्याचे चित्र आहे. चालू वर्षी वेळेवर पाऊस झाला असता, तर खरिपाच्या पेरण्या वेगाने होण्याची शक्‍यता होती. मात्र पावसाअभावी पेरण्यांच्या गतीवर परिणाम झाल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षावर पाणी फेरल्याची स्थिती आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
...अन् आमचं स्वप्नच पुरानं खरडून नेलं पटवर्धन कुरोली, पंढरपूर, जि. सोलापूर : आधीच दोन...
जायकवाडी कालव्याच्या पाण्यामुळे पीक...परभणी : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून...
एमएआयडीसी’च्या सक्षमीकरणासाठी...मुंबई : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास...
उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...उस्मानाबाद  ः खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपात...
गंगापूर धरण क्षेत्रात पावसाचे पुनरागमन...नाशिक  : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
कृषी सहायकांच्या अडचणी न सोडविल्यास २०...अकोला ः अमरावती विभागातील कृषी सहायक ते कृषी...
हवामान बदलाचा शेती, शेतकऱ्यांच्या ...नांदेड  ः हवामान बदलामुळे येत असलेल्या...
अमरावती कृषी विभागातील ३२ टक्के पदे...अमरावती  :  रिक्‍त पदांमुळे...
शेतकरी राजकारण अन् जाती-धर्मात अडकला :...नाशिक ः शेतकऱ्यांचे प्रश्न कमी होण्यापेक्षा ते...
शिरसाईचे पाणी लाभार्थ्यांसाठी मृगजळचउंडवडी, जि. पुणे : पावसाळा सुरु होवून अडीच महिने...
विम्याचे दावे निकाली काढा; आयआरडीएआयचे...नवी दिल्ली : पुराचा फटका बसलेल्या कर्नाटक,...
उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरूचसिमला/धर्मशाला : उत्तर भारतात विशेषतः हिमालयाच्या...
आता चर्चा फक्त व्याप्त काश्‍मीरवर :...काल्का, हरियाणा : पाकिस्तानप्रती कठोर भूमिका घेत...
पुण्यात वांगी, तोंडली, गाजरासह...पुणे   ः राज्यातील पूरस्थिती...
सिंधूताई विखे पाटील यांचे निधनशिर्डी, जि. नगर : दिवंगत माजी खासदार बाळासाहेब...
महाजनादेश यात्रेला बुधवारपासून नंदूरबार...नंदुरबार ः राज्यातील पूरस्थितीमुळे स्थगित झालेली...
पुणे बाजार समिती प्रशासकपदी वर्णी...पुणे  : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे...
प्रतिकूल हवामानामुळे जुन्नर तालुक्यातील...नारायणगाव, जि. पुणे  : दोन महिन्यांपासून...
नगर जिल्ह्यातील दहा ते अकरा तालुक्यांवर...नगर  ः राज्याच्या काही भागांत जोरदार पावसाने...
पीक नुकसानीबाबत शेतकऱ्याने मांडली कृषी... कऱ्हाड, जि. सातारा ः घरात हुतं नव्हतं...