पुरेशा पावसानंतरच पेरणी करावी

अनेक ठिकाणी अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. यामुळे चांगल्या पावसानंतर जमिनीतील पुरेशा ओलाव्याचा विचार करूनच बियाण्यांची पेरणी करावी, असे आवाहन जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर बोटे यांनी केले आहे.
Sowing should be done after adequate rainfall
Sowing should be done after adequate rainfall

पुणे ः राज्यात मॉन्सूनचे दमदार आगमन झाल्यानंतर दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. तर अनेक ठिकाणी अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. यामुळे चांगल्या पावसानंतर जमिनीतील पुरेशा ओलाव्याचा विचार करूनच बियाण्यांची पेरणी करावी, असे आवाहन जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर बोटे यांनी केले आहे.

खरिपाबाबत बोठे म्हणाले, ‘‘जिल्ह्यात ७ जूनअखेर ६३ मिलिमीटर एवढा पाऊस झाला असून, साधारणतः १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यानंतरच जमिनीतील पुरेसा उपलब्ध ओलाव्यांचा विचार करून वाफसा परिस्थितीत बियाणे पेरणी करण्यात यावी. जिल्ह्याचे खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र १ लाख ८४ हजार २७८ हेक्टर आहे. गेल्या हंगामात (२०२०-२१) २ लाख १४ हजार ९७२ हेक्टर क्षेत्रावर भात, बाजरी, मका, मूग, उडीद, सोयाबीन व भुईमूग या मुख्य पिकांची पेरणी झाली होती. जिल्ह्यात सोयाबीन व मका क्षेत्रात वाढ होत आहे. या हंगामात (२०२१-२२) मध्ये २ लाख १९ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावर मुख्य पिकांच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी बियाण्‍यांची मागणी २८ हजार ८६ क्विंटल एवढी आहे.’’

महाबीज व खासगी वितरकांकडून एकूण २८ हजार ८६ क्विंटल बियाणे मागणी पैकी २२ हजार ७२१ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. जिल्ह्यात तृणधान्य पिकांमध्ये भात हे प्रमुख पिकासाठी १२ हजार ६८८ क्विंटल बियाणे मागणी असून, तुलनेत १३ हजार ९३७ (११० टक्के) बियाणेपुरवठा झाला आहे. वेल्हा, मावळ, मुळशी, भोर, हवेली, जुन्नर, खेड, पुरंदर तालुक्यांत रोपवाटिका तयार करण्यास सुरुवात झाली आहे. तसेच नियोजित केलेल्या क्षेत्रासाठी एकूण २ लाख १४ हजार ८०० टन खताची आवश्यकता असून, जिल्ह्यामध्ये गतवर्षीचा शिल्लक साठा ८९ हजार ७६३ टन व चालू हंगामामध्ये पुरवठा झालेला खतसाठा ४९ हजार २२१ टन अशाप्रकारे एकूण १ लाख ३८ हजार ९८४ टन उपलब्ध झाले आहे. असे बोठे यांनी सांगितले. 

जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द  केंद्र सरकारच्या आदेशानुसार अनुदानित खताच्या अनुदानामध्ये झालेल्या वाढीच्या परिपत्रकानुसार निश्‍चित झालेल्या दरानेच खतांची विक्री करण्यासंबंधी जिल्ह्यातील सर्व खत विक्रेत्यांना सूचना दिल्या आहेत. कोणत्याही विक्रेत्याने जादा दराने विक्री केल्यास कारवाई करण्यात येईल. याबाबत कळविण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर बोटे (९४२२३८४३८४) यांनी केले. संनियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्र. ९४०४९६३९६४, ९४२१३६७०२०, ०२०-२५५३७७१८/२५५३८३१० असा असून, ई-मेल आयडी dsaopune@gmail.com, adozppune@gmail.com असा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com