agriculture news in marathi Sowing slowed down due to insufficient rainfall in Khandesh | Page 3 ||| Agrowon

खानदेशात पुरेशा पावसाअभावी पेरण्यांची गती मंदावली

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 जून 2021

जळगाव :  खानदेशात जूनमधील सरासरीच्या सुमारे २८ टक्केच पाऊस झाला आहे. काही भागात पाऊस कमीच आहे. तर काही भागात समाधानकारक पाऊस आहे. पावसाच्या लहरीपणामुळे पेरण्यांना गती आलेली नाही. 

जळगाव :  खानदेशात जूनमधील सरासरीच्या सुमारे २८ टक्केच पाऊस झाला आहे. काही भागात पाऊस कमीच आहे. तर काही भागात समाधानकारक पाऊस आहे. पावसाच्या लहरीपणामुळे पेरण्यांना गती आलेली नाही. 

जूनमध्ये १८० मिलिमीटर पाऊस अपेक्षित असतो. जून महिना अर्धा संपला तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. काही भागात जोरदार पाऊस झाला. पण  तो सर्वत्र नसल्याने जमिनीत हवा तसा वाफसा नाही. पेरणीसाठी किमान ४० ते ६० मिलिमीटर पावसाची आवश्यकता आहे. परंतु एवढा पाऊस कुठेही एका दिवसात झालेला नाही. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पूर्वमोसमी पाऊस झाला.

हा पाऊसदेखील सर्वत्र नव्हता. नंतर शेतकऱ्यांनी पूर्वमशागत व इतर कामे उत्साहाने सुरू केली, परंतु नंतर पावसाने हुलकावणी दिली. जूनमधील सरासरीच्या २८ टक्केही पाऊस झालेला नसल्याने नद्या, नालेही कोरडेच आहेत. तापी नदीत गेल्या आठवड्यात चांगले प्रवाही पाणी आले होते. तापी नदीवरील हतनूर धरणात नदीच्या उगमस्थान व पूर्णा नदीतून पाण्याची आवक वाढल्याने हतनूर (ता.भुसावळ) येथील धरणाचे आठ दरवाजे उघडले होते. गेल्या आठवड्याच्या अखेरीस हे आठ दरवाजे बंद करण्यात आले.

खानदेशातील इतर नद्या कोरड्याच आहेत. या नद्यांच्या लाभक्षेत्रात पाऊस हवा तसा झालेला नाही. गिरणा नदीत ३१ मे रोजी टंचाई दूर करण्यासाठी पाणी सोडण्यात आले होते. ८ जून रोजी पाणी नदीच्या शेवटच्या भागात म्हणजेच धरणगाव, जळगाव तालुक्यातील गावांपर्यंत पोचले. हे पाणीही कूपनलिका, विहिरींद्वारे होणारा उपसा व इतर बाबींमुळे आटत आहे. 

तण नियंत्रणाचे काम सुरु

पांझरा, अनेर, सुकी, गोमाई, सुसरी, वाघूर आदी नद्या कोरड्याच आहेत. टंचाईची समस्या खानदेशात कुठेही नाही. परंतु पेरणी तसेच पिकांसाठी चांगल्या पावसाची गरज आहे. सध्या पाऊस नसल्याने कापूस, केळी पिकात तणनियंत्रणाचे काम हाती घेण्यात आले आहे. पण, खते देणे व इतर कामे शेतकरी टाळत आहेत.


इतर बातम्या
उपलोकायुक्त, सचिव, आयुक्तांनी सांगूनही...पुणे ः जलयुक्त शिवार अभियानावर खर्च दाखवलेल्या...
‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर...पुणे ः साखर उद्योगाचा गाळप हंगाम यंदा आव्हानात्मक...
विमा लाभापासून शेतकऱ्यांना वंचित...नगर : नैसर्गिक आपत्ती, अन्य कारणाने नुकसान होऊनही...
साताऱ्यात पावसाचा जोर कमी झालासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट...
केळी उत्पादकांना वादळ नुकसानभरपाईची...अकोला : जिल्ह्यात अकोट तालुक्यात १५ मे २०२० रोजी...
अतिवृष्टिग्रस्तांना अन्नधान्य,...नाशिक : आपत्तीग्रस्त आणि पूरग्रस्तांना मदत म्हणून...
तुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५...कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी)...
टीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही...नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...
खानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...
अतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...
चिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...
‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...
`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...
पेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...
बुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...
पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...